Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Pay (8th ) Pay Commission Update ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणे संदर्भात आत्ताची नविन अपडेट समोर येत आहे , सरकारी कर्मचाऱ्यांना दर 10 वर्षांनी नविन वेतन आयोग लागु करण्यात येत असतो .सन 2026 मध्ये आठवा वेतन आयोग अपेक्षित आहे . याकरीता वेतन आयोग समितीची स्थापना या वर्षी होणे आवश्यक आहे .
केंद्रीय वित्त मंत्रालयाचे राज्य वित्तमंत्री पंकज चौधरी यांनी नविन वेतन आयोग संदर्भात विधीमंडळांमध्ये स्पष्टीकरण देताना नमुद केले आहे कि , सध्या नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , सरकारची कोणतीही भुमिका नाही .यामुळे या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणे संदर्भात वेतन आयोग समितीची स्थापना या वर्षी होण्याची शक्यता कमीच आहे . कारण येत्या 13 मार्च पासुन आचारसंहिता लागु होणार आहे .
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग समिती स्थापन करणे बाबत आणखीण वाट पाहावी लागणार आहे . निवडणुका पुर्वी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण केले जात आहेत , परंतु नविन वेतन आयोग बाबत अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही . यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी दिसुन येत आहेत .
केंद्रीय कामगार युनियन कडून या संदर्भात केंद्र सरकारला वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहेत , केंद्रीय कर्मचाऱ्यांना या लोकसभा निवडणुका पुर्वीच नविन वेतन आयोग समितीची स्थापन होण्याची मोठी शक्यता होती . परंतु केंद्र सरकारकडून याबाबत सकारात्मक भुमिका न घेतल्याने , नविन वेतन आयोग समिती स्थापना करणेबाबत निर्णय पुढील वर्षी पर्यंत ढकलला जाईल .
आठवा वेतन आयोगांमधील मोठी पगार वाढ : आठवा वेतन आयोगांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वाढ होणार आहे . नविन वेतनांनुसार मुळ वेतनात वाढ केली जाते , यामुळे आपोआपच इतर देय वेतन / भत्यांमध्ये वाढ होईल .
सन 2026 पासुन नविन वेतन आयोग अपेक्षित : सातवा वेतन आयोग हा सन 2016 मध्ये लागु करण्यात आला होता , सदर सातवा वेतन आयोग समितीची स्थापना ही सन 2014 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती . वेतन आयोग लागु करण्यापुर्वी 02 वर्षी अगोदर वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येते . परंतु यावेळी वेतन आयोग समितीची स्थापना उशिरा होत असल्याने , आठवा वेतन आयोगास विलंब होण्याची शक्यता आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.