लाईव्ह मराठी पेपर, प्रणिता पवार : सध्या देशामध्ये केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू आहे , परंतु सध्याच्या वाढत्या महागाईमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन / आठवा वेतन आयोग लागू करण्याचे चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत . या अनुषंगाने राज्यसभेमध्ये अर्थ मंत्रालय कडून महत्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे ..
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासून 46 टक्के दराने DA दर लागू करण्यात येईल . तर सदर महागाई भत्त्याचा दर जानेवारी 2024 पर्यंत पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता असल्याने , कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग निश्चित करणे संदर्भात , कर्मचाऱ्यांकडून पाठपुरावा त्याचबरोबर संसदीय सदस्या कडून वारंवार नवा वेतन आयोग लागू करणे संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत ..
यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मागे भत्ता 50% पेक्षा अधिक झाल्यास नवा वेतन आयोग किंवा सातवा वेतन आयोगामध्येच तज्ञाकडून सुचवल्याप्रमाणे ऑटोमॅटिक पे रिविजन सिस्टम प्रमाणे स्वयंचलित पद्धतीने वेतनामध्ये वाढ करण्यात येईल का ? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत होता पण याबाबत केंद्रिय राज्य मंत्री यांनी एक महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहेत ..
राज्यसभेच्या एका सदस्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठवा वेतन आयोग संदर्भात दिनांक 25 जुलै 2023 रोजी उपस्थित केलेल्या प्रश्नाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटले आहे की , तूर्तास केंद्र सरकार कोणत्याही प्रस्तावावर विचार करीत नाही , असे स्पष्ट केले आहे . म्हणजेच केंद्र सरकारकडून तूर्तास आठवा वेतन आयोग लागू करणे संदर्भात कोणताही प्रस्ताव तयार करण्यात आला नाही , यावर कामगार युनियन कडून मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी तसेच पेन्शनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !