Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee new pay commission update] : सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू करणे संदर्भात केंद्र सरकारकडून काल दिनांक 22 जुलै 2024 रोजी महत्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे  .

केंद्र सरकारचे आज दिनांक 23 जुलै रोजी अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे . सदर अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन योजना तसेच नवीन वेतन आयोग  संदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती . परंतु काल दिनांक 22 जुलै रोजी संसदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर प्रश्न विचारले असता , केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आले .

यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात प्रश्न उपस्थित केले असता केंद्र सरकारकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आले . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन ची अर्थसंकल्पातील आशा संपली आहे . तसेच नवीन वेतन आयोग लागू करणे संदर्भातील देखील संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता .

सदर नवीन वेतन आयोग लागू करणे संदर्भात केंद्रीय राज्य वित्तमंत्री पंकज चौधरी यांच्याकडून स्पष्टीकरण देताना नमूद करण्यात आले की , सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करणे बाबत समितीचे गठन करण्याचा केंद्र सरकारचा अद्याप कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे . यामुळे अर्थसंकल्पात जुनी पेन्शन व आठवा वेतन आयोग समिती स्थापन करणे याबाबत कोणतेही तरतूद नमूद नसल्याचे स्पष्ट झाले आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग सन 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे.  यामुळे आठवा वेतन आयोग समिती स्थापन करण्याची , केंद्र सरकारची कोणत्याही प्रकारची घाई नसल्याचे नमूद करण्यात झाले आहे.  यामुळे आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग साठी प्रतीक्षा करावी लागणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *