Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Pay Commission ] : मोदी सरकारची देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट लवकरच मिळू शकते , देशातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणे संदर्भात समितीचे गठण केले जाणार असल्याची महत्वपुर्ण माहिती मिडीया रिपार्ट नुसार समोर येत आहे .

आचार संहिता व नवा वेतन आयोग निर्णय शक्य आहे का ?  : सध्या देशांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका करीता आचार संहिता देशात लागु करण्यात आलेली आहे . अशा काळांमध्ये सरकारला कोणत्याही प्रकारचे नविन निर्णय घेता येत नाहीत . परंतु सरकारी कर्मचाऱ्यांना लगेच नवा वेतन आयोग लागू करण्यात येणार नसून , केवळ आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत , समितीचे गठण करणे शक्य आहे .

शिवाय नविन वेतन आयोग लागु करण्याच्या 2 वर्षे अगोदरच समितीचे गठण करुन सांख्यिकीय माहितीचे संकलन , नविन वेतनश्रेणी याबाबत अभ्यास करुन सरकारला सादर करण्यात येते . सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2016 पासुन सातवा वेतन आयोग लागु करण्यात आलेला असून , आता पुढील नविन ( 8 th Pay Commission )  सन 2026 मध्ये लागु होणे अपेक्षित आहे .

मोदी सरकार कडे अजुन दोन महिन्यांचा अवधी आहे , परंतु पहिल्या टप्यातील मतदान प्रक्रिया हि दिनांक 19 एप्रिल 2024 पासुन सुरुवात होत आहे . यामुळे दिनांक 19 एप्रिल पर्यंत नविन वेतन आयोग समितीचे गठण केले जावू शकते , ज्यामुळे कर्मचाऱ्यांना काही अंशी दिलासा प्राप्त होईल .

नविन वेतन आयोगांमध्ये होईल मोठी वाढ : नविन ( 8 वा ) वेतन आयोगांमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये मोठी वाढ होणार आहे , केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 3.68 पट फिटमेंट फॅक्टर वाढीच्या मागणीनुसार , केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुळे वेतनांमध्ये 8 हजार रुपयांची वाढ होईल ,तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा विचार केला असता , यांमध्ये 6 हजार रुपयांची वाढ होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *