Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee New Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आता नविन / आठवा वेतन आयोगाचे वेध लागले आहेत . सन 2016 नंतर आता दहा वर्षानंतर नविन वेतन आयोगानुसार वेतन सुधारणा करण्यात येणार आहेत . या संदर्भात आत्ताची नविन अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात ..
वेतन आयोगाची पार्श्वभुमी : सरकारी कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 1996 मध्ये पाचवा वेतन आयोग लागु करण्यात आला होता , पाचवा वेतन आयोगाचे अध्यक्ष न्या.एस.रत्नावेल पंडियन हे होते . तर सहावा वेतन आयोग हे 20 जुलै 2006 रोजी लागु करण्यात आले सहावा वेतन आयोगाचे अध्यक्ष हे बीएन श्रीकृष्ण हे होते . तर सातवा वेतन आयोग हे कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2016 पासुन लागु करण्यात आला ज्यांमध्ये फिटमेंट फॅक्टर मध्ये 2.57 पटीने वाढ करण्यात आली , सातवा वेतन आयोगाचे अध्यक्ष अशोक कुमार माथुर हे आहेत .
वरील पाचवा , सहावा व सातवा वेतन आयोगाची पार्श्वभुमी पाहीली असता , 10 वर्षानंतर नविन वेतन आयोग लागु करण्यात आला आहे .यानुसार विचार केला असता , आता सरकारी कर्मचाऱ्यांना नविन / आठवा वेतन आयोग हे सन 2026 मध्ये लागु होणे अपेक्षित आहेत . त्याकरीता वेतन आयोगाची स्थापना दोन वर्ष पुर्वीच करण्यात येत असते , म्हणूनच आठवा वेतन आयोग समितीची स्थापना सन 2024 मध्ये करणेबाबत कर्मचारी संघटनांकडून सरकारवर दबाव टाकत आहेत .
असा असेल नविन वेतन आयोग : कामगार युनियनने केलेल्या मागणीनुसार 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे , मुळ वेतनांमध्ये सुधारणा केली जाईल . ज्यांमध्ये सध्य स्थितीत असणाऱ्या किमान मुळ वेतन मध्ये 8,000/- रुपयांची वाढ केली जाईल , ज्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हे 18,000/- वरुन वाढून 26,000/- रुपये इतका होईल .
राज्य कर्मचाऱ्यांचा नविन वेतन आयोग असा असेल : आठवा वेतन आयोगांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतन लागु केला असता , किमान मुळ वेतन हे 15,000/- वरुन वाढून 21,000/- इतका होईल जी 6,000/- रुपये इतकी वाढ असणाार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.