New Education Policy : दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमांमध्ये मोठा बदल ; विषय वाढीसह ,सेमिस्टर पॅटर्ननुसार होणार परीक्षा !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Education Policy ] : नविन शैक्षणिक धोरण 2020 हे येत्या जुन महिन्यांपासून ( पुढील शैक्षणिक वर्षांपासून ) राज्यात तसेच देशांमध्ये लागु करण्यात येणार आहेत . यामुळे दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमांसह अनेक परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत .

नविन वाढीव विषयांचा होणार समावेश : या नविन शैक्षणिक धोरणानुसार भारतीय भाषांची सक्ती करण्यात आलेली आहे , आता यापुढे इयत्ता दहावी मध्ये 2 ऐवजी तीन भाषांची सक्ती असेल , त्यापेकी एक भारतीय भाषा असण्याची सक्ती करण्यात आलेली आहे . यांमध्ये तीन भाषा तर सात मुख्य विषयांचा समावेश असणार आहे . म्हणजेच एकुण 10 विषयांचा समावेश असणार आहे .विषयांमध्ये सामाजिक शास्त्र , विज्ञान , कला , शारीरिक शिक्षण , व्यावसायिक शिक्षण , पर्यावरण शिक्षण , संगणक शास्त्र , गणित या विषयांचा समावेश होणार आहे .

12 वी परीक्षा मध्ये होणार बदल : दहावीच्या विषयांमध्ये करण्यात आलेल्या बदलानुसार , इयत्ता 11 वी व 12 वी परीक्षेच्या स्तरावर बदल करण्यात आलेला आहे . आता इयत्ता 12 वी मध्ये दोन भाषा आणि मुख्य विषय असणार आहेत . सर्व विषय यांचे चार गटांमध्ये विभागणी करण्यात येणार आहेत , यांमध्ये भाषा विषय , व्यावसायिक शिक्षण , शारीरिक शिक्षण , सामाजिक विज्ञान , गणित , विज्ञान , आंतर विद्याशाखीय विषय अशा चार गटांमध्ये विभागणी करण्यात येणार आहेत .

यापुढे बोर्ड परीक्षा ऐवजी सेमिस्टर पॅटर्न नुसार होणार परिक्षा : नविन शैक्षणिक धोरणांनुसार दहावी , बारावीचे बोर्ड परीक्षा रद्द केले जाणार आहेत , तर त्याऐवजी सेमिस्टर पद्धतीनुसार परीक्षा घेण्यात येणार आहेत . तर एखाद्या विषय राहीला असेल तर , पुढील सहामहिन्यात लगेच फक्त अनुत्तीर्ण झालेला विषयाकरीता परीक्षेस बसता येईल . म्हणजे विद्यापीठ पदवी परीक्षा पद्धतीनुसार सेमिस्टर पॅटर्न 10 वी व 12 करीता अंमलात येणार आहेत .

Leave a Comment