Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Education Policy ] : राज्यांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांपासून नविन शैक्षणिक धोरण लागु करण्याच्या सर्व तयारी पुर्ण झालेल्या आहेत , पुढील जुन महिन्यांपासुन राज्यात नविन शैक्षणिक धोरण प्रभावी अंमल बजावणी करण्यात येईल .

या नविन शैक्षणिक धोरणामुळे अनेक प्रकारच्या संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत . या नविन शैक्षणिक धोरणांमध्ये जास्त करुन स्वयंरोजगार कशा पद्धतीने वाढेल याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहेत . यामुळे या नविन शैक्षणिक धोरणांमध्ये व्यवसायिक विषयांकडे जास्त करुन लक्ष दिले जाणार आहेत  . यामध्ये व्यवसायिक कौशल्ये कोणत्या अभ्यासक्रमांतुन वाढेल याचा विचार केला जाणार आहे , यामुळे निश्चितच स्वयंरोजगारच्या संधी अधिक वाढणार आहेत .

नविन शैक्षणिक धोरणांमध्ये जे व्यवसायिक अभ्यासक्र आहेत , त्याकडे शासनांचे अधिक भर दिले जाणार आहेत . कारण नविन शैक्षणिक धोरणांनुसार व्यवसाय शिक्षणाला अधिक महत्व दिले जाणार आहेत . यांमध्ये इयत्ता 5 वी पासूनच काही नविन विषयांचा समावेश केला जाणार आहे , यांमध्ये व्यवसाय कौशल्य , विद्यार्थीनी करीता वेगळे व्यवसाय कौशल्ये जसे ब्युटी पार्लर कोर्स , शिवणकाम इ. व्यवसाय कौशल्यांकडे भर दिले जणार आहेत .

त्याचबरोबर यांमध्ये थेरॉटिकल ज्ञानांपेक्षा प्रात्यक्षिक ज्ञानांकडे अधिक लक्ष दिले जाणार आहेत . तसेच बोर्डाच्या परीक्षा रद्द करुन सेमिस्टर पॅटर्नचा अवलंब केला जाणार आहे .ज्यामुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण देखिल कमी होईल .  तर लहान वर्गातील विद्यार्थ्यांना जास्त ताणतणावाचे अभ्यासक्रम न लागु करता खेळातुन शिक्षण ही संकल्पना विचारात घेतली जाणार आहे . इयत्ता 02 री पर्यंत पुस्तकी ज्ञान कमी करुन मनोरंजनात्मक शिक्षण दिले जाईल , ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाकडे कल वाढेल .

अशाचे प्रकारचे शैक्षणिक धोरण हे युरोपिय देशांमध्ये लागु आहे , भारताने प्रथम जी शिक्षण प्रणाली स्विकारली ती रशिया , इंग्लंड या देशांप्रमाणे स्विकारली होती , त्यानंतर सदर युरोपीयन देशांने काळांनुसार लगेचच शैक्षणिक धोरणांमध्ये बदल लागु केला परंतु भारतांमध्ये अशा प्रकारचे शैक्षणिक धोरण खुप उशिरा लागु झाले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *