Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Education Pattern News ] : राज्यांमध्ये पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजे माहे जुन महिन्यांपासून , नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे राज्य शासनांकडून निर्देश देण्यात आलेले आहेत . याकरीता राज्य शासन स्तरावरुन काही उचित बदल लागु करणेबाबत , सुचना देण्यात आलेल्या आहेत .
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री.चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यापीठे तसेच महाविद्यालयांना नविन शैक्षणिक धोरणांची अंमलबजाणी पुढील शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
जुहू येथील एसएनडीटी महिला विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्य नविन शैक्षणिक धोरणांची अंमलबावणी बाबतच्या चर्चासत्रांमध्ये बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले . यावेळी एसएनडीटी विद्यापीठाचे कुलगुरु उज्वला चक्रदेव तसेच राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरु नविन शै.धारण अंमलबजावणीकरीता गठीत सुकाणू समितचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते .
महाराष्ट्र राज्यांमध्ये नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुसार NCRF राष्ट्रीय अभ्यासक्रम क्रेडिट फ्रेमवर्क स्वीकारुन सन 2023-24 पासून अंमलबजावणीगती देण्यात आलेली आहे . यांमध्ये राज्यातील 200 स्वायत्त महाविद्यालये व 1700 पदवीत्तर सेंटर यांचा समावेश आहे , सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून राज्यातील सर्व महाविद्यांलयांत सदर नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे निर्देश मा.चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत .
असे असेल नविन शैक्षणिक धोरण : नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुसार पुर्व प्राथमिकचे 3 वर्षे + पहिली व दुसरी असे पाच वर्षे मिळून पहिला टप्पा असणार आहे . तर दुसऱ्या टप्यांमध्ये तिसरी ते पाचवी , तर तिसऱ्या टप्यांमध्ये सहावी ते आठवी वर्गांचा समावेश होईल . तर चौथ्या टप्यांमध्ये नववी ते बारावी वर्गांचा समावेश असणार आहे .