Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Driving Rules ] : वाहन चालविण्याच्या नियमांत मोठा बदल करण्यात आलेला आहे , सदर नियमांनुसार कठोर कारवाईसह गाडी जप्तचे सुधारित नियमावली करण्यात आलेले आहेत , सदर नविन नियम पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
कमी वयाचे मुलांने वाहन चालविल्यास कठोर कारवाई : वय वर्षे 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुले जर वाहन चालवित असतील , अशा वेळी त्यावर कठोर कारवाई तर होईलच . तर सदर मुलांच्या आई- वडीलांवर देखिल कठोर कारवाई केली जाणार आहे .
गाडी जप्तीचे निर्देश : अशा प्रकारे लहान मुलांकडून वाहन चालविल्यास , सदर गाडी जप्तीचे निर्देश सदर सुधारित नियमावलीमध्ये देण्यात आलेले आहेत . तर हेच नियम जर जड वाहन चालविण्याच्या बाबतीत किमान वय हे 20 वर्षांपेक्षा कमी नसावेत .
म्हणजेच हलके वाहने करीता किमान वय हे 18 वर्षे तर जड ( माल ) वाहतुकीच्या वाहन चालविण्याकरीता किमान 20 वर्षे पुर्ण होणे आवश्यक असेल . सदर बाबतीत एक नविन मॉडल ऑपरेटिंग सेवा जाहीर करण्यात आली असून , यांमध्ये ई-चलनांची सुविधा ट्राफिक पोलिसांना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .
सदर नविन नियमांमुळे नागरिकांना वाहन चालविण्या संदर्भातील सदर नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहेत .