Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ new 8th pay commission news ] : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे , कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीसह इतर देय वेतन व भत्त्यामध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे . याबाबतची सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेवूयात .

केंद्र सरकारी कर्मचारी युनियन कडून केंद्र सरकारला नवीन वेतन आयोग समिती स्थापन करण्यासाठी वेळोवेळी निवेदन देण्यात येत आहेत . सदर निवेदनाची बाब लक्षात घेता , केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग समिती स्थापन करण्यास सकारात्मकता दर्शवली आहे . याबाबत येत्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली जाणार आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर सन 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे . त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या येत्या अर्थसंकल्पामध्ये याबाबत मोठी घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण सरकारी कर्मचाऱ्यांकडून नवीन वेतन आयोग बाबत मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे .

यामुळे केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून याबाबत सकारात्मकता दर्शवण्यात आलेली आहे व येत्या अर्थसंकल्पामध्ये नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . यामुळे सन 2026 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ होईल , तसेच इतर देय वेतन व भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे .

एकंदरीत सरकारी कर्मचाऱ्यांना 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनामध्ये वाढ केली जाणार आहे . यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये 8000/- हजार रुपयांची वाढ होणार आहे . म्हणजेच किमान मूळ वेतन 18,000/- हजार रुपये वरून 26000/-  हजार रुपये इतका होणार आहे . तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये 6,000/-  हजार रुपयांची वाढ होणार आहे  .म्हणजेच किमान मूळ वेतन 15,000/- रुपये वरून 21,000/- रुपये इतका होणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *