Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ NCP ajit pawar group minister possible list ] : महायुती पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्येष्ठ 10 नेत्यांना मंत्री पदाची शपथ दिली जाणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहीर होत आहेत , अशा नेत्यांची यादी पुढील प्रमाणे जाणून घेवूयात .
उद्या दिनांक 05 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री पदासह महत्त्वाच्या खात्यावर मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे . यामध्ये ज्येष्ठ नेत्यांना प्रथम स्थान दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 10 ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे . याबाबत अजित पवार यांच्याकडून 10 नेत्यांची यादी तयार केल्याचे बोलले जात आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संभाव्य मंत्र्यांची नावे : यामध्ये अजित पवार , धनंजय मुंडे , छगन भुजबळ ,आदिती तटकरे , अनिल पाटील , संजय बनसोडे , नरहरी झिरवाळ , मकरंद पाटील , इंद्रनील नाईक , दत्ता भरणे या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे .
यामध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदासह महसूल खाते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . महसूल खाते हे महत्त्वाचे खाते असल्याने यावर एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रस्सीखेच करत असल्याचे पाहायला मिळत आहे . तर एकनाथ शिंदे यांना महसूल खाते न मिळाल्यास , गृह खाते मागु शकतील.