Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Nav Tejaswini Yojana ] : राज्य शासनांच्या महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजे माविमच्या माध्यमातुन राज्यांमध्ये नव तेजस्विनी ही महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येते . या निधी करीता राज्य शासनांकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येते .

नव तेजस्विनी योजना नेमकी काय आहे ? : या योजना अंतर्गत ग्रामीण भागामधील महिला बचत गटांना रोजगार प्राप्त होईल , राज्यातील नोंदणीकृत्त महिला बचत गटांना रोजगार / स्वयंउद्योग / लघु उद्योगाला चालना देण्यासाठी सदर योजना अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते . ज्यामुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतीलच त्याचबरोबर स्वयंरोजगार निर्मितीस चालना मिळेल .

या योजना अंतर्गत महिला बचत गटांनी निर्मित केलेली उत्‍पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत , यामुळे बचत गटांची उत्पादित वस्तु ही ऑनलाईन विकली जाईल . या योजना अंतर्गत राज्यातील छोटे व्यवसाय आणि गृह उद्योग सुरु करण्याकरीता कमी व्याजदारांमध्ये कर्जे उपलब्ध करुन देण्यात येते .

व कर्जाची नियमित परतफेडीवर 40 टक्के पर्यंत सबसिडी देखील देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे . यामुळे या योजना अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक जिवनमान उंचावले आहेत .

या योजनाचा लाभ कसा घ्याल : या योजनाचा लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्हाच्या महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयास भेट द्यावी . सविस्तर आवेदन करुन योजनांचा लाभ प्राप्त करावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *