पोक्रा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना मध्ये राज्यातील तब्बल 6959 नवीन गावांचा समावेश ; सविस्तर यादी व GR पहा ..

Spread the love

Live marathiprasar संगीता पवार [ Nanaji Deshmukh krishi Sanjivani Yojana ] : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 02 अंतर्गत राज्यातील तब्बल 6959 नवीन गावांचा समावेश करण्यास , राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागाकडून दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे .

दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 02 करिता नवीन गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता . सदर निर्णयाच्या मान्यतेनुसार , दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे की , नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 02 साठी गाव निवड समितीने प्रकल्पाच्या टप्पा 02 मध्ये समाविष्ट करावयाच्या गावासाठी निकष निर्धारित करून , सदर निवड करण्यात आलेल्या एकूण 6959 गावांच्या यादीस मान्यता देण्यात येत आहे .

याकरिता राज्याचे मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे , सदर समिती प्रकल्प अहवाल , प्रकल्प अमलबजावणी आराखडा व विविध कार्य प्रणालीपुस्तिका इत्यादी तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणे त्यास मान्यता देणे व मंत्रिमंडळाची मान्यता घेणे अशा विविध कार्य व जबाबदाऱ्या सदर समितीस देण्यात आली आहेत .

सदर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन करिता राज्यातील 21 जिल्ह्यातील एकूण 6959 नवीन गावांचा समावेश करण्यात आलेला आहे . यामध्ये जिल्हा तालुका निहाय गावांची यादी शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे.या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 6959 गावातील शेतकऱ्यांना सदर योजनेअंतर्गत आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत .

यामुळे सदर गावातील शेतकऱ्यांनी कृषी संदर्भातील विविध योजना करिता आवेदन करावेत . याबाबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता खाली लिंक वर क्लिक करावेत .

शासन निर्णय (GR)

Leave a Comment