Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ nanaji deshamukh krushi Sanjivani yojana ] : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारे , प्रकल्प उभारणी करीता सहाय्य केले जाते . या योजनांची उद्देश ,पात्रता , मिळणारे लाभ युनिट याबाबतचे सविस्तर माहिती पुढीप्रमाणे जाणून घेवूयात ..
या लाभार्थ्यांना मिळते या योजना अंतर्गत लाभ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत अनुसुचित जाती / जमाती महिाला , दिव्यांग शेतकरी , सर्वसाधारण या प्राधान्य क्रमानुसार अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ दिला जातो .लाभ घेण्यासाठी 7/12 , 8 अ उतारा , जातीचा दाखला , दिव्यांग प्रमाणपत्र सदर कागदपत्रे असणे आवश्यक असणार आहेत .
सदर योजना अंतर्गत समाविष्ट असणारे लाभ घटक : सदर योजना अंतर्गत भाडे तत्तावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे , एकात्मिक पॅक हाऊस / कृषी उत्पादनाचे संकलन केंद्र , पॅक हाऊस निर्मिती , भाजीपाला / फळ प्रक्रिया केंद्र , औषधी / सुगंधी वनस्पती प्रक्रिया युनिट , रेफ्रिजरेटेड व्हॅन अथवा भाजीपाला / फळे वाहतुकीसाठी वाहन , शीतगृहे , गोदाम व छोटे वेअर हाऊस , धान्य प्रक्रीया युनिट , कडधान्य मिल , अन्न प्रक्रिया युनिट ..
तेल गाळप युनिट , मुरघास युनिट , मसाले युनिट , हळद प्रक्रिया युनिट , मधुमक्षिका पालन युनिट , दुध प्रक्रिया युनिट , कांदा चाळ ( सामुहिक ) , बियाणे प्रक्रिया उपकरणे , बियाणे प्रक्रिया शेड / सुकवणी यार्ड , बियाण्यांची साठवण / गोदाम , संपुर्ण बिजप्रक्रिया युनिट गोडावन/ शेड सह इ. बाबींकरीता आर्थिक सहाय्य दिले जाते .
वैयक्तिक लाभासाठीचे घटक : वृक्ष लागवड , फळबाग लागवड , हवामन अनुकुल तंत्रज्ञान शेती , पॉली हाऊस , पॉली टनेल , पॉली हाऊस / शेडनेट हाऊसमध्ये भाजीपाला / फुलपिकांचे उच्चमुल्यकिंत लागवड , परसातील कुक्कुटपालन , रेशिम उद्योग , मधुमक्षिका पालन , गोड्या पाण्यातील मत्स्यपालन , गांडूळ खत , शेततळे , ठिबक सिंचन , तुषार सिंचन , विहीर , विहीर पुनर्भरण इ. बाबीकरीता लाभ अनुज्ञेय केले जाते ..
अर्ज कसा कराल : सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता https://dbt.mahapocra.gov.in/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत .