Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme Update ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत मा.राज्याध्यक्ष तथा राज्य सचिव महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांना मा.नाना पटोले – अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्याकडून दिनांक 10.04.2024 रोजी महत्वपुर्ण पत्र सादर करण्यात आलेला आहे .

सदर पत्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागू व्हावी ही जिव्हाळ्याची आणि प्रमुख मागणी आहे . यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने द्वारा अनेक आंदोलने , मोर्चे करण्यात आलेले आहेत . ज्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार असून या आंदोलनात माझ्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेतृत्वाने सुद्धा प्रत्यक्ष येवून आपणास पाठिंबा दिलेले आहे . असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच महाराष्ट्रासह देशातील तमाम कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना पुर्ववत लागू व्हावी , खासगीकरण बंद व्हावे , बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे . देशात काँग्रेस पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये जसे कि राजस्थान , छत्तीसगड , हिमाचल प्रदेश , झारखंड , राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे .

तसेच कर्नाटक व तेलंगणा मधील काँग्रेस सरकार लवकरच जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे , महाराष्ट्र राज्यात देखिल 1982-81 ची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी ही आमची जाहीर भूमिका आहे , राज्यात व देशात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर हे आश्वासन आम्ही नक्कीच पूर्ण करु असा विश्वास देतो असे सदर पत्रांमध्ये मा.नाना पटोले यांनी नमुद केले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *