Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ namo shetkari mahasanman nidhi yojana 4 th installment ] : राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान येाजनांच्या धर्तीवर , नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लागु करण्यात आली आहे . या योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 3 हप्ते अदा करण्यात आलेले असून ,चौथ्या हप्त्यासाठी राज्य शासनांकडून निधीची तरतुद करण्यात आलेली आहे .
नुकतेच केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनाचा 17 वा हप्ता अदा करण्यात आला आहे . राज्य शासनांकडून देखिल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता अदा करण्यासाठी , तब्बल 1720/- कोटी रुपयांच्या निधी वितरणास मंजूर देण्यात आलेली आहे . यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येईल .
या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार चौथ्या हप्त्याचे पैसे : नमो शेतकरी योजना अंतर्गत चौथा हप्ता अदा करण्यासाठी पहिल्या टप्यांमध्ये 1720/- कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे , तर सदर निधी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट वर्ग करण्याकरीता महाडीबीटी पोर्टलवर नमो शेतकरी महासंगण निधी योजनेचे मॉड्युल विकसित करण्यात आलेले आहेत .
यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा माहे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल , असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहेत . राज्य शासनांकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्युल विकसित करण्यात आलेले असल्याने , सदर मॉड्युलची तांत्रिक प्रक्रिया पुर्ण झाल्याच्या नंतर तात्काळ चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे .
शेतकऱ्यांना नुकतेच पीएम किसान योजना अंतर्गत 2000/- मिळाले आहे , तर आता पुन्हा महासन्मान निधी योजना अंतर्गत 2000/- रुपयांचा लाभ मिळणार आहे , यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा प्राप्त होणार आहे .
पीएम किसान योजनांच्या आर्थिक लाभात वाढ होण्याची शक्यता ? : मिडीया रिपोर्ट मध्ये आलेल्या न्युजनुसार केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनांच्या आर्थिक रक्कमेत आणखीण 2,000/- रुपयांची वाढ केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे , म्हणजेच वर्षाला 6,000/- रुपये ऐवजी 8,000/- रुपये करण्याची मोठी चर्चा मिडीया रिपोर्ट मध्ये सुरु आहे .
खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !