Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Namo Shetakari Mahasanman Nidhi Yojana ] : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी वितरण बाबत राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 21.02.2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनांच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राज्य शासनांकडून सुरु करण्यात आलेली असून , या योजना अंतर्गत पहिला हप्ता शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेला आहे . पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति शेतकरी 6,000/- तर यांमध्ये राज्य शासनांची आणखीण 6,000/- रुपये एवढी भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यात येत आहे .
या योजनाच्या दुसरा हप्ता (माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर ) लाभार्थ्यांना अदा करण्याकरीता रुपये 1792 कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती , यानुसार आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1792 कोटी इतका निधी वितरीत करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे .
सदरचा खर्च हा पीक संवर्धन ,लहान / सीमान्त शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची योजना , नमो शेतकरी महासन्मान निधी योजना , अर्थसहाय्यक या लेखाशिर्षाखाली भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येणारा निधी खर्च करण्याची करण्याची जबाबदारी ही आयुक्त कृषी यांची असणार आहे .
या संदर्भात राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..