Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Nadya jod prakalp ] : नद्या जोड प्रकल्प अंतर्गत केंद्र शासनांकडून 12 तालुक्यांमध्ये पाणी फिरविण्याच्या उद्देशाने महत्वाकांशी प्रकल्पास मंजूरी देण्यात आली आहे . या प्रकल्पासाठी येणारा तब्बल 7015 कोटी रुपयांस मंजुरी देण्यात आली आहे .

नद्याजोड प्रकल्प संदर्भात केंद्र शासनांकडून महत्वपुर्ण घेण्यात आले आहेत , पावसाचे पाणी समुद्रात न जावू देता , दुष्काळी भागांमध्ये पाण्याचा प्रवास बदलणे , जेणेकरुन सिंचनासाठी पाण्याचा योग्य तो वापर होईल . व उत्पादन क्षमतामध्ये वाढ होण्यास सहाय्यभुत ठरेल .

या योजनांच्या माध्यमातुन केंद्र शासनांकडून नार – पार गिरणा नदी जोड प्रकल्पास मंजूरी देण्यात आली आहे . या प्रकल्पास एकुण 7015 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे . या योजनांच्या माध्यमातुन पश्चिम वाहिनी असणाऱ्या नार पार गिरणा या नदी खोऱ्यातुन पाणी नाशिक , जळगाव जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये वळविण्यात येणार आहेत .

यातुन जळवपास 10.64 टीएमसी पाण्यांचा वापर प्रस्तावित आहे . सदर प्रकल्पातुन नाशिक नारपार ही नाशिक मधील पेठ , सुरगाणा तालुक्याती नदी असून सदर नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असते , सदर पाणी हे सदर नद्या जोड प्रकल्पाच्या माध्यमातुन नारपार , गिरणा या नद्यांमध्ये वळविण्यात येईल .

हे पण वाचा : लिपिक , शिपाई पदांच्या 323 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

ज्यामुळे नाशिक जिल्ह्यातील देवळा , मालेगाव , सटाणाा , कळवण या तालुक्यांना मोठा फायदा होणार आहे . तसेच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव , अमळनेर , चाळीसगाव , भडगाव , एरंडोल ,पाचोरासह इतर तालुक्यांना देखिल सदर पाण्याचा शेती सिंचनासाठी फायदा होणार आहे . त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील काही भागांना देखिल या पाण्याचा फायदा होणार आहे .

सदर प्रकल्प मंजुरी बाबतचे पत्र राज्याचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी राज्य सरकारला सादर केल्यानंतर राज्याचे उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी सदर माहिती प्रसार माध्यमांच्या माध्यमातुन शेअर केली , व केंद्र शासनांचे आभार मानले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *