Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Nadya Jod Prakalp ] : सन 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या संकल्प पत्रांमध्ये नद्या जोड प्रकल्पाचा अंतर्भाव करण्यात आलेला होता . परंतु सन 2014 नंतर भाजपाची सत्ता स्थापनेनंतर देखिल नद्या जोड प्रकल्प राबविण्यात आला नाही .

याबाबत संसदेमध्ये चर्चा झाली होती , परंतु यावर काही नेत्यांनी विरोधी दर्शविल्याने सदर प्रकल्प अंमलात आला नाही . यंदाच्या वर्षी मराठवाडा / विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात कडक दुष्काळ पडल्याने , लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागले आहे . अनेक ठिकाणी पाण्याचे टंकर सुरु करण्यात आले होते .

या भागातील पाण्याचे संकट कायमस्वरुपी दुर करण्यासाठी नद्या जोड प्रकल्प राबविणे अत्यंत महत्वाचे आहे , असे मराठवाडा / विदर्भातील नेत्यांना वाटते , यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे . मराठवाड्यात प्रामुख्याने लातुर , धाराशिव , बीड , परभणी  , हिंगाली, नांदेड  तर विदर्भामध्ये  यवतमाळ , वर्धा , वाशिम , अकोला , या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण होते .

नद्या जोड प्रकल्पामुळे पाण्याचा प्रवास सर्व भागातुन होईल , तर पाण्याची मुबलकता  वाढून शेती मधील उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल . भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाल्यास नद्या जोड प्रकल्पावर अधिक भर देण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रवत्याने दिली आहे .

शिवाय यंदा मराठवाड्यातील लोकप्रतिनीधींनी पाणी प्रश्नावर अधिक जोर धरला होता . यामुळे विरोधांनी नद्या जोड प्रकल्पावर बोट ठेवले होते , म्हणून भाजपाची सत्ता स्थापन झाल्यास , नद्या जोड प्रकल्पांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *