Spread the love

Live Marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ mukhyamantri yojanadut yojana ] : राज्यांमध्ये मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रम अंतर्गत तब्बल 50,000 हजार युवकांना रोजगार निर्मिती करुन देण्याच्या अंमलबजावणीबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 07 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

राज्य शासनांच्या विवधि योजनांच्या प्रचार तसेच प्रसिद्धी तसेच जास्तीत जास्त नागरिकांना योजनांचा लाभ घेता यावेत याकरीता त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दुत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासुन मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रम सुरु करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात आलेली आहे .

या योजनाचे मुख्य उद्दिष्ट्ये : या योजनाची मुख्य उद्दिष्ट्ये म्हणजे , राज्य शासनांच्या विविध योजनांची प्रचार , प्रसिद्धी करणे या करीता त्यांचा लाभ हा जास्तीत जास्त नागरिक यांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री योजनादुत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमण्याचे उद्दिष्ट्ये आहेत .

ग्रामीण भागांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत करीता 01 हजार व शहरी भागांमध्ये 5 हाजर लोकसंख्याकरीता 1 योजनादुत या प्रमाणात एकुण 50 हाजर इतक्या योजनादुतांची निवड करण्यात येणार आहेत . सदर योजनादुतास प्रतिमहा 10,000/- रुपये इतके ठोक मानधन देण्यात येणार आहेत .

योजनादुत निवडीकरीता आवश्यक पात्रता : उमेदवाराचे वय हे 18-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तसेच शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणे आवश्यक असेल . तसेच उमेदवारास संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असेल , तसेच उमेदवाराकडून अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक असेल . तसेच राज्याचा रहीवाशी असणे आवश्यक असेल . तर उमेदवारांचे आधार कार्ड व त्याच्या नावाने बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक असेल .

आवश्यक कागदपत्रे : योजनादुत कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज , आधारकार्ड , पदवी प्रमाणपत्र , अधिवास दाखला , बँक खात्याचा तपशिल , पासपोर्ट फोटो , हमीपत्र ..

अधिक माहितीकरीता खालील सविस्तर शासन निर्णय पहावा ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *