Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Mukhyamantri Vayoshri Yojana ] : राज्यातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमाना परत्वे येणारे अपंगत्व , अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने / उपकरणे खरेदी करणेकरीता तसेच मन : स्थास्थ  केंद्र योगोपचार केंद्र इ.द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे .

राज्यातील वय वर्षे 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनांमध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमाना परत्वे येणारे अपंगत्व तसेच अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर मन : स्थास्थ केंद्र योगोपचार केंद्र इ.द्वारे त्यांचे मानसिक स्थास्थ अबाधित ठेवण्याकरीता राज्यांमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मा.मंत्रीमंडळाने सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे . सदरचा शासन निर्णय हा राज्य शासनांच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांकडून दि.06.02.2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

योजनेचे ध्येय व उद्दिष्ट : राज्यामधील वय वर्षे 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक यांना त्यांच्या दैनंदिन जीवनांमध्ये सामान्य स्थितीत जगण्याकरीता आणि त्यांना वयोमाना परत्वे येणारे अपंगत्व तसेच अशक्तपणा यावर उपाय योजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करणेकरीता त्याचबरोबर मन : स्थास्थ केंद्र योगोपचार केंद्र इ.द्वारे त्यांचे मानसिक स्थास्थ अबाधित ठेवणे याकरीता प्रबोधन व प्रशिक्षण करीता एकवेळ एकरकमी रुपये 3000/- ( अक्षरी – तीन हजार रुपये ) पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण ( DBT ) प्रणालीद्वारे लाभ प्रदान करण्यात येणार आहेत .

सदर योजना अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक  लाभातुन चष्मा , श्रवणयंत्र , ट्रायपॉड , स्टिक व्हील चेअर , फोल्डिंग वॉकर , कमोड खुर्ची , नि-ब्रेस , लंबर बेल्ट , सर्वाइकल कॉलर इ. उपकरण / साधने ज्येष्ठ नागरिकांना खरेदी करता येणार आहेत . सदर योजना ही 100 टक्के अर्थसहाय्य राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे . तसेच आर्थिक लाभ थेट लाभ वितरण प्रणाली द्वारे 3000/- रुपये च्या मर्यादेत वितरीत करण्यात येणार आहेत .

पात्रता / निकष : सदर योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक असेल तसेच दिनांक 31.12.2023 पर्यंत लाभार्थीचे वय हे 65 वर्षे पुर्ण झाले असावेत . लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे रुपये 2 लाखाच्या आतमध्ये असावेत .. यांमध्ये 30 टक्के महिलांचा समावेश करण्यात येणार आहेत .

आवश्यक कागतपत्रे : या योजना अंतर्गत आधारकार्ड / मतदान कार्ड , राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स , पासपोर्ट आकाराचे 02 फोटो , स्वयं – घोषणापत्र , शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागतपत्रे ..

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *