Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mukhyamantri tirth darshan yojana shasan nirnay ] : महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोर्फत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यास मान्यता देणेबाबत राज्य शासनांच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत दिनांक 14 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
या योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना असे आहे , या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करुन देणे हा आहे . तर या योजनेचे व्याप्ती पाहीली असता , सदर योजना अंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरीता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येणार आहे , तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000/- इतकी राहणार आहे . यांमध्ये भोजन , प्रवास , निवास इ. सर्व बाबींचा समावेश असणार आहे .
या योजनांचा लाभ कोण घेवू शकतो / पात्रता : या योजना अंतर्गत राज्यातील वय वर्षे 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक लाभ घेवू शकतील , सदर ज्येष्ठ नागरिक हे राज्यातील रहीवाशी असणे आवश्यक असेल . तसेच लाभार्थी जेष्ठ नागरिकांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावेत .
हे ज्येष्ठ नागरिक अपात्र ठरतील : सदर योजना अंतर्गत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य जर आयकरदाता असेल तर अपात्र ठरेल , तसेच ज्यांच्या कुटुंबामधील सदस्य हा नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ / भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्था मध्ये कार्यरत आहेत अथवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असल्यास , असे ज्येष्ठ नागरिक अपात्र ठरतील .
तसेच ज्यांच्याकडे चारचाकी आहे ( ट्रॅक्टर वगळून ) अशा कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक अपात्र ठरतील . तसेच प्रवासासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम नसणारे व संसर्गजन्य रोगाने ग्रस्त , ऱ्हदयाशी संबंधित श्वसन रोग , अशा रोगाने त्रयस्थ नागरिकांना सदर योजनाचा लाभ घेता येणार नाही .
प्रवास कसा करता येईल : सदर योजनांच्या माध्यमातुन रेल्वे , बस , तसेच एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांमार्फत प्रवास करता येईल .
आवश्यक कागदपत्रे : आधारकार्ड / रेशनकार्ड , वैद्यकीय प्रमाणपत्र , पासपोर्ट फोटो ,राज्याचा रहिवाशी , जन्म दाखला , उत्पन्नाचा दाखला , हमीपत्र , नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक ..
अर्ज कसा करावा ? : सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी योजनेच्या अर्ज पोर्टलवर / मोबाईल ॲपद्वारे / सेतु सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन माध्यमातुन अर्ज सादर करु शकता ..
या संदर्भातील सविस्तर माहिती / शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..