Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Scheme Atal Pension Scheme – Monthly Contrubution Scheme ] : आपण जर वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळवू इच्छिता तेही आयुष्यभरासाठी तर आपण केंद्र सरकारच्या पेन्शन योजनांमध्ये दरमहा / तीमाही अथवा / सहामाही पद्धतीने हप्ता भरुन आयुष्यभर 5000/- रुपयांची पेन्शन मिळवू शकता .
Atal Pensino Scheme : अटल पेन्शन योजना ही खास देशातील सर्वसामान्यासाठी तयार करण्यात आलेली आहे . जेणेकरुन गरीबांना उतारवयांमध्ये आर्थिक सहाय्य होते . या पेन्शन योजनेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे आपण वयाच्या 18 ते 40 वर्षापर्यंतचे सर्वजन यांमध्ये गुंतवणुक करु शकता . तसेच या पेन्शन योजनेचे प्रिमियम अत्यल्प आहेत . ते ही मासिक 42/- रुपये पासून सुरुवात होते .
आपले वय जर 18 वर्षे असेल तर आपणास वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 1000/- रुपये पेन्शन हवी असल्यास , आपणांस प्रतिमहा 42/- रुपये तर दरमहा 2000/- रुपये पेन्शन साठी दरमहा 84 रुपये तर 3000/- मासिक पेन्शन साठी 126 /- दरमहा प्रिमियम भरावा लागेल . तर दरमहा 4000/- रुपये मासिक पेन्शन हवी असल्यास दरमहा 168/- रुपये भरावा लागेल , तर मासिक 5,000/- रुपये पेन्शन हवी असल्यास , दरमहा 210/- रुपये भरावा लागेल .
जर आपले वय हे 39 वर्षे असल्यास आपणांस 1000/- मासिक पेन्शन करीता दरमहा 264/- रुपये तर 2000/- मासिक पेन्शन साठी 528/- रुपये तर 3000/- रुपये मासिक पेन्शन साठी 792/- रुपये तर 4000/- मासिक पेन्शन साठी 1054/-रुपये तर 5000/- मासिक पेन्शनसाठी दरमहा 1318/- रुपये दरमहा प्रिमियम भरावा लागेल .या संदर्भातील वयानुसार / पेन्शनुसार सविस्तर चार्ट पुढीलप्रमाणे पाहु शकता .
जर सदर लाभार्थ्याचा सदर गुंतवणुक कालावधीमध्ये मृत्यु झाल्यास , वारसदारास पेन्शन रक्कम नुसार घेण्यात आलेल्या प्लॅन नुसार लाभ मिळते . जर 1000/- रुपये पेन्शनचा प्लॅन घेतला असल्यास मृत्यु नंतर वारसाला 1.7 लाख रुपये तर 2000/- मासिक पेन्शन प्लॅन मध्ये 3.40 लाख रुपये तर 3000/- मासिक प्लॅन मध्ये 5.10 लाख रुपये तर 4000/- मासिक पेन्शन प्लॅन मध्ये 6.80 लाख रुपये तर 5000/- रुपये मासिक पेन्शन मध्ये 8.50 लाख रुपये वारसांना लाभ प्राप्त होईल .