Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Monsoon Update News ] : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार देशांमध्ये या वर्षी सरासरीपेक्षा 106 टक्के पाऊस होणार आहे , गेल्या वर्षी राज्यांमध्ये मराठवाडा , विदर्भात दुष्काळ पडला होता , तर कोकण विभागांमध्ये चक्रिवादळामुळे , अनेक नुकसान झाले होते .
परंतु यंदाच्या वर्षी देशांमध्ये सरासरीपेक्षा 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे . भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी जारी केलेल्या माहितीनुसार , दिनांक 8 जुनपर्यंत मान्सून भारतामध्ये दाखल होईल , दरवर्षी मान्सून भारतामध्ये 7 जुनपर्यंत दाखी होत असतो , परंतु यंदा एक दिवस उशिरा दाखल होईल , असे हवामान खात्याने सांगितले आहेत .
दिनांक 08 जुन 2024 पर्यंत मान्सून केरळ राज्यात दाखल होईल असा , अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाणे देशांमध्ये अधिक म्हणजेचे सरासरी 106 टक्के इतका पाऊस पडू शकतो , असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .मागील वर्षी भारतांमध्ये पावसाने खुपच उशिरा हजेरी लावली होती , तर मराठवाडा व विदर्भामध्ये पावसाचे मान्सून नंतर काढता पाय घेतला होता .
यंदाच्या वर्षी अल निनोची स्थिती पाहाता , पावसाळा ऋतु सुरु झाल्याच्या नंतर अल निनोचा प्रभाव नष्ट होईल , यामुळे पुढील काळांमध्ये अल निनोचा प्रभाव होईल , म्हणून माहे मे महिन्याच्याच्या शेवटी पर्यंत अवकाळी पाऊस राहील , तर दिनांक 8 जूनपासून मान्सून पावसास सुरुवात होईल .
तर दिनांक 08 जून ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये देशात सर्वाधिक पाऊस पडणार आहे , म्हणजेच माहे जुन ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावाधीमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे .