शेतकऱ्यांसाठी मोदी सरकाचा सर्वात मोठा दिलासादायक निर्णय ; या 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये मोठी वाढ !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ modi govt. give new nirnay for farmer ] : मोदी सरकारने काल दिनांक 19 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा महत्वपुर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे , या निर्णयांमध्ये खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत ठरविण्यात आलेली आहे .

या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे  .खरीप हंगामातील 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे .या निर्णयाचा फायदा राज्यातील मराठवाडा , विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अधिक होणार आहेत , नेमक्या कोणत्या पिकाला किती किमान आधारभूत किंमत ठरविण्यात आली आहे . याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

तांदुळ / तुर दाळ : तांदळाला प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत ही 2300/- रुपये ठरविण्यात आली आहे , जे कि मागील वर्षापेक्षा 117 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे .  तर तुर डाळीकरीता किमान आधारभूत किंमत ही 7550/- इतकी ठरविण्यात आलेली आहे जे कि मागील वर्षापेक्षा 550/- रुपयांनी जास्त आहे .

उडीद डाळा / मुंग डाळी / शेंगदाणे : उडीद डाळीसाठी 7400/- रुपये किमान आधारभुत किंमत ठरण्यात आली आहे तर , मुंग डाळीसाठी किमान आधारभूत किंमत 8682/- रुपये इतकी ठरविण्यात आली आहे . तर शेंगदाण्याच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये 6783/- इतकी ठरविण्यात आली आहे .

कापुस / ज्वारी : कापसाच्या किमान आधारभूत किंमती मध्ये 7121/- रुपये इतकी ठरविण्यात आली आहे , तर ज्वारीच्या आधरभूत किंमती मध्ये 3371/- रुपये इतकी ठरविण्यात आली आहे .

बाजरी / मक्का : मक्क्याच्या आधारभूत किंमतीमध्ये 2225/- रुपये इतकी ठरविण्यात आली आहे , तर बाजरीसाठी किमान आधारभूत किंमत ही 2625/- रुपये इतकी ठरविण्यात आली आहे .

नाचणी / तीळ / सुर्यफुल : नाचणी ला 4290/- रुपये / तीळीला 8717/- तर सुर्यफलासाठी 7230/- रुपये इतका ठरविण्यात आला आहे .

Leave a Comment