कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळविण्यासाठी मुख्यालयीच रहावे लागणार ? गलेलठ्ठ पगार असूनही कर्तव्यात कसुरचा आरोप !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ MLA Bamb once again targets teachers for staying at the headquarters ] : गंगापुरचे आमदार आमदार प्रशांत बंब हे नेहमीचे सरकारी कर्मचाऱ्यांना निशाणा करत असतात . त्यांचे म्हणणे असे कि , जे कर्मचाऱ्यांना घरभाडे मिळविण्यासाठी त्यांनी मुख्यालयी वास्तव्य करणे आवश्यक आहे .

त्यांच्या म्हणण्यानुसार , शिक्षक हे मुख्यालयी वास्तव्य करीत नसुन ,ते शहरी भागांमध्ये वास्तव्य करतात .तेथून ते रोज अपडाऊन करतात . तर खोटे प्रमाणपत्र सादर करुन घरभाडे भत्ताचा लाभ घेतात असा आरोप आहे .

तर शिक्षकांचे काम हे फक्त 10 ते 04 या वेळेत शिकविणे असा नसून , ते गावा वास्तव्य करुन , गावात संस्कार तसेच व्यसन मुक्तीसारखे काम करावेत . असे शिक्षकांचे काम असून शिक्षक केवळ शिकविण्यापुरता मर्यादित झाला असल्याने , इतर त्यांचे कर्तव्ये शिक्षक बजावत नसल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब योनी केला आहे .

शिक्षकांवर नेहमीच निशाणा : आमदार प्रशांत बंब यांच्या म्हणण्यानुसार खाजगी शाळेत शिक्षकांना 15 हजार पेक्षा कमी वेतन असून , देखिल दर्जेदार शिक्षण दिले जाते , तर सरकारी शाळेत 60 ते दीड लाख रुपये पर्यंत पगार असूनही दर्जेदार शिक्षण दिले जात नसल्याचा आरोप आहे .

यासाठी प्रशांत बंब यांनी राज्याचे नवे शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेवून दर्जेदार शिक्षणासाठी नवे पावले उचलणार असल्याचे माहिती देण्यात आली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment