Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ milk business nanded ] : नांदेड जिल्ह्यातील मानसपुरी येथील दत्तात्रय नारायण गोरे हे दरमहा 5 लाख 25 हजार रुपये प्रतिमहा दुग्ध व्यवसायातुन कमवत आहेत . यांच्या यशाची गाथा पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
दत्तात्रय हे पदवीधर आहेत , त्यांना नोकरी न मिळाल्याने व पुढील शिक्षणासाठी पैसे नसल्याने त्यांनी दुग्धव्यवसाय करण्याचा निर्धार केला , प्रथम त्यांच्याकडे एक एकर जमीन होती . त्यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्धार केल्यानंतर प्रथम एका म्हशीपासुन सुरुवात केली .
तर आज रोजी 15 वर्षांमध्ये त्यांनी एका म्हशीचा गाढा हा 25 म्हशीपर्यंत नेला आहे . आज त्यांचा प्रतिदिनचा दुध कलेक्शन हा 250 लिटर पर्यंतचा आहे . ते दुध शासकीय डेअर व त्यांच्या स्वत: च्या दुकानातुन विक्री करण्यात येते . तर त्यांना त्यांच्यामधून दररोज 17500/- रुपये पर्यंतचा आर्थिक लाभ मिळत आहे .
त्यांच्याकडे सर्व 25 म्हशी ह्या जाफराबादी प्रकारच्या आहेत . यांमध्ये त्यांना एकुण 5 लाख 25 हजार रुपये इतका मासिक उत्पन्न मिळतो तर खर्च वजा करता , जवळपास 3 लाख रुपये इतका निव्वळ नफा दरमहिन्याला मिळतो .