लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : आपण जर नोकर करता असाल किंवा बेरोजगार असाल तर आपल्याला काही वेळ देवून महिना लाखो रुपयांची कमाई करु शकता , यामधील कमाईचे प्रमाण वाढल्यास नोकरी देखिल सोडू शकाला , जर मग जाणून घेवूयात त्या व्यवसायाबद्दल संपुर्ण माहिती ..
ग्रामीण भागांमध्ये आपण जर राहत असाल तर शेती हा प्रमुख व्यवसाय आहे , परंतु या शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन , कुकुटपालन , मधुमक्षिका पालन , रेशम उद्योग ,दुग्धव्यवसाय अशा अनेक व्यवसाय आहेत . परंतु यांमध्ये सर्वात कमी खर्चीक व कमी वेळ द्यावा लागणारा व्यवासाय म्हणजे पशुपालन हा व्यवसाय होय . आजकाल तरुण मंडळी पशुपालन या व्यवसायाकडे जास्त वळत आहेत . तर काही लोक नोकरी करत – करत दुग्धव्यवसाय हा व्यवसाय करत आहेत .
दुग्धव्यवसाय करत असताना आजकाल राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पंजाबी म्हशी , गायी , जर्शी गायी यांचे पालन केले जात आहेत . पंजाबी म्हशी , गायी व जर्शी गायी तसेच आफ्रिकन म्हशी हे एकावेळेसचे 12-18 लिटर दुध देतात , तर दोन वेळेसचे 24-36 लिटर दुध होते . याचे जर सरासरी 60/- रुपये प्रमाणे लिटर ग्रहीत धरल्यास एका म्हशी / गायीपासून 1440 रुपये ते 2,160/- रुपये इतके पैसे मिळतील यांमधून त्यांचा चारा सोडून इतर खाजचा खर्च वजा केला असता एका गायी / म्हशी पासुन निव्वळ नफा हा 1000/- रुपये ते 1800/- इतका फायदा होईल .
असे जर किमान 5 गायी / म्हशींचे पालन केले असता , दिवसाला किमान 5000/- रुपये तरे 9000/- इतका फायदा होईल . म्हणजेच महिन्याला किमान 150,000/- रुपये ते 270,000/- इतका निव्वळ फायदा होईल . यांमध्ये होल्स्टीन गाय ही युरोपीय गाय एका वेळी 45 लिटर पर्यत दुध देते .तर देशी गायींचा विचार केला असता साहिवाल ही गायीची जात एका वेळेचे 25-30 लिटर दुध देते .
तर म्हशीचा विचार केला असता मुर्राह ही म्हशीचा जात सर्वात जास्त 26-38 लिटर दुध देत असते . यामुळे आजच्या युगांमध्ये दुधांची असणारी प्रचंड मागणी व दुधाचे वाढते दर लक्षात घेता दुग्धव्यवसाय करणे आपल्यासाठी अधिक फायद्याचे असणार आहेत .ह्या व्यवसायाला पुर्ण वेळ द्यायची आवश्यकता नाही , शिवाय हा व्यवसाय नोकर करत करात येते व यांमध्ये अधिक जोखिम देखिल नाही .
- SSC / HSC महाराष्ट्र राज्य फेब्रु/ मार्च बोर्ड परीक्षा 2024 वेळापत्रक प्रसिद्ध ; पाहा / डाऊनलोड करा PDF
- राज्यात दि.27 ते 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील या 09 जिल्ह्यात पावसाची शक्यता ; तर दि 01 ते 04 डिसेंबर काळात अवकाळी पावसाची शक्यता !
- एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार निवडुन येणाऱ्या संभाव्य आमदारांची नावे ; या 10 अपक्ष आमदारांचा देखिल समावेश .
- शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- इ.10 वी / 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रक !