Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Meeting organized to resolve issues of backward class officers/employees in the state ] : मागास वर्गीय अधिकारी / कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मागास प्रवर्गीय संघटनांच्या प्रतिनिधीसमवेत बैठकीबाबत , सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , महासचिव कास्ट्राईव कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक 09 जुलै 2024 व दिनांक 04 सप्टेंबर 2024 रोजीच्या पत्रानुसार , सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 03.05.2011 व दिनांक 03.03.2018 च्या परिपत्रानुसार बैठकांचा आढावा वर्षातून एकदा प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभागाने घ्यावा असे निर्देश असतानांही आढावा घेतला जात नाही ..
व त्यामुळे बरेच विभाग प्रमुख बैठका घेत नाहीत . त्यामुळे सदर परिपत्रकानुसार कार्यवाही करणेबाबत सर्व खाते प्रमुखांना कळविण्याचे तसेच मागास प्रवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी चर्चेस वेळ मिळणेबाबतची विनंती करण्यात आलेली आहे .
त्या अनुषंगाने असे नमुद करण्यात येत आहेत कि , सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 03.03.2018 च्या परिपत्रकानुसार मागास वर्गीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवाशर्ती , सेवाभरती , पदोन्नत्या , बदल्या , गोपनीय अहवाल या सारख्या संवेदनशील बाबींवर अभ्यासपुर्वक व गांभीर्याने निर्णय घेण्याच्या दृष्टीने अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त मागास वर्गीय संघटनांच्या प्रतिनिधींशी वेळोवेळी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने , प्रशासकीय विभाग प्रमुखांनी ..
दर सहा महिन्यातून किमान एकदा , कार्यालय प्रमुख / विभाग प्रमुख यांनी तीन महिन्यांतुन किमान एकदा अथवा आवश्यकता असेल तर त्यावेळी संघटनांच्या प्रतिनिधीशी चर्चा करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . तसेच मागासवर्गीय अधिकारी / कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन त्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवरच निकाली निघतील असे पहावेत असे सूचित करण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.