Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Meeting About Old Pension News ] : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत जुनी पेन्शन वर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढण्यात आलेला नाही . या करीता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र राज्य संघटनेमार्फत तातडीची बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत . या बाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र मार्फत दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी महत्वपर्णु प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकामध्ये नमुद आशयानुसार सदर बैठकीचा विषय राज्य कार्यकारीणी सभेची सूचना देण्यात आलेल्या आहेत . राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारिणीची महत्वाची सभा शनिवार दिनांक 03 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता नाशिक येथील नागरी सेवा प्रबोधिनी सभागृहात आयोजित करण्यात आलेले आहेत .
याकरीता सर्व पदाधिकारी मंडळ व जिल्हा अध्यक्ष व सरचिटणीस यांनी वेळेवर सभेस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करा या मागणी संदर्भातील प्रगतीचा आढावा या सभेत घेण्यात येणार आहेत . तसेच संघटनेच्या सर्व स्तरावरील पुढील वाटचालीची आखणी देखील याच सभेत करण्यात येणार आहेत . त्या दृष्टीने सभेचे महत्व लक्षात घेवून सर्व संबंधितांनी सभेत वेळेवर उपस्थित राहण्याचे विनंती करण्यात आलेली आहे .
सभेपुढील विषय : या सभेत मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन व मंजुरी तसेच बेमुदत संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासन दरबारी मांडण्यात आलेल्य प्रलंबित मागण्यांचा प्रागतिक आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच आखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने पुकारलेल्या आगामी आंदोलनबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहेत . तसेच सन 2023 च्या वार्षिक सभासद वर्गणीचा आढावा घेण्यात येणार आहेत . तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणरे इतर विषय घेण्यात येतील ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.