Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mazi ladki bahin yojna apps – nari shakti apps ] : सध्या माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी सेतु सूविधा केंद्रावर तुफान गर्दी पाहायला मिळत आहे ,यामुळे अनेकांची गैरसोई होत असल्याने , राज्य शासनांकडून यापुर्वी अस्थित्वात असलेल्या नारी शक्ती या मोबाईल ॲप्सच्या माध्यमातुन आवेदन करण्यास सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

कोणते ॲप्स आहे ? : आपणांस प्ले स्टोर वर जावून नारीशक्ती दुत असे मराठी अथवा इंग्रजी मध्ये Narishakti doot असे नाव टाईप केल्यास भगवा रंगाचा फेटा असणारा थिमचे ॲप्स डाऊनलोड करुन घ्यावेत . यांमध्ये प्रथम आपले मोबाईल क्रमांक टाकुन , ओटीपी पडताळणी करुन घ्यावेत . त्यानंतर अटी व शर्तींस परवानगी दिल्याच्यानंतर आपणांस आपली किरकोळ माहिती भरण्याचा विचारणा होईल .

त्यानंतर आपणांस सदर ॲप्समध्ये राज्यातील इतर योजनां देखिल दिसतील , यांमध्ये आपणांस लाडकी बहीण योजनेस सलेक्ट करायचे आहेत . सदर योजना सलेक्ट केल्याच्या नंतर आपणास आवेदन अर्ज अचुक भरायचा आहे , यांमध्ये आपले नाव , पत्ता , आधार कार्ड क्रमांक , बँक खाते इ. माहिती भरायची आहे .

अर्ज भरण्याच्या नंतर खाली कागदपत्रे अपलोड करायचा ऑप्शन दिला गेला आहे , यांमध्ये 01. आधारकार्ड 02.अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला 03.उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड 04.अर्जदाराचे हमीपत्र हे कागदपत्रे अनिवार्य असणार ओत ,तर याशिवाय बँक पासबुक , महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास , पतीचे कागदपत्रे हे दोन कागदपत्रे ऐच्छिक ( आवश्यकता नुसार ) असणार आहेत .

सविस्तर अर्ज भरल्याच्या नंतर व सर्व कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर शेवटी Accept डिसकलमेर यावर क्लिक करुन स्वीकारा हे ऑप्शन दाबावेत त्यानंतर माहिती जतन करा या ऑप्शनवर क्लिक करावेत . म्हणजेच आपला अर्ज यशस्वीरित्या भरला जाईल . याकरीता आपल्याला कोणत्याही सेतु केंद्रावर जाण्याची आवश्यक राहणार नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *