या मसाले वर्गीय पिकांची करा लागवड होईल सर्वात जास्त कमाई . मसाले वर्गीय पिकांचे जाणून घ्या भाव !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Masale Crops Rates ] : आपण पारंपारिक पद्धतीने , घेतले जाणाऱ्या पिकांची शेती करतो , आपण शेतींमध्ये कोणत्याही प्रकारचे नविन प्रकारचे प्रयोग , नविन पिकांची लागवड केल्यास आपणास निश्चितच मोठा फायदा होतो , यांमध्ये मसाले वर्गीय पिकांची लागवड केल्यास , आपणांस निश्चितच मोठा आर्थिक फायदा होईल , कारण मसाले वर्गीय पिकांची लागवड राज्यात मोठ्या प्रमाणात करण्यात येत नाहीत , कोकणांमध्ये तर विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात काही प्रमाणात मसाले वर्गीय पिकांची लागवड करण्यात येते .

मसाले वर्गीय पिकांचे दर जर पाहिले तर आपण जे पारंपारिक पिकांची शेतील करतो त्यापेक्षा अधिक आर्थिक फायदा मिळेल .यांमध्ये सर्वात अग्रण्यस्थानी आहे ते म्हणजे , लाल मिरची होय . लाल मिरची ( उच्च प्रतीची ) मध्यमचा सर्वसाधारण भाव जर पाहिला तर 31,250/- रुपये प्रति क्विंटर एवढा आहे . शिवाय मिरचीची लागवड राज्यांमध्ये सर्वच जिल्ह्यात करु शकतो , कारण मिरचीसाठी राज्यातील सर्वच जिल्ह्याचे वातावरण पोषक आहेत .

हळद : हळद देखिल मसाले वर्गीय पिक असून , आपण रोजच्या दैनंदिन आहारांमध्ये वापर करत असतो . हळदीचा सर्वसाधारण दर पाहिला तर 17500/- रुपये प्रति क्विंटर एवढा आहे . हळदीची लागवड सांगली , सातारा , कोल्हापुर , रत्नागिरी , सोलापूर , पुणे  या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते .

जिरे : जिऱ्याचा भाव जर पाहिला तर 40,000/- रुपये प्रति क्विंटर एवढा आहे , जिरेच्या लागवड केल्यास आपणांस सर्वाधिक फायदा होतो , जिऱ्याची लागवड राज्यात अहमदनगर ,औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करण्यात येते .

काही मसाले वर्गीय पिके व त्यांची सध्याचे सर्वसाधारण प्रति क्विंटल दर पुढीलप्रमाणे पाहुयात .. ( सरचा दर हा मुंबई बाजार समितीचा असून , इतर बाजार समितीमधील दर हे कमी जास्त होवू शकतात .)

अ.क्रमसाले वर्गीय पिकांचे नावेप्रति क्विंटर सर्वसाधारण दर
01.लाल मिरची31,250/-
02.हळद17,500/-
03.जिरे40,000/-
04.धने11,250/-
05.मेथी बी8500/-
06.काळी मिरे75,500/-
07.ओवा12,300/-
08.बडीशेप7,500/-
09.जायफळ24,000/-
10.वेलची1,72,000/-
11.लवंग90,000/-

वरील मसाले वर्गीय पिकांचे भाव पाहिले असता , सदर पिकांची लागवड केली असता , आपणांस अधिकचा नफा मिळेल . परंतु यासाठी आवश्यक वातावरण , खते व योग्य बियाणे यांची परिपुर्ण माहिती घेवून मसाले वर्गीय पिकांची शेती केल्यास , निश्चितच आपणांस शेतीमधून अधिक आर्थिक नफा होईल .

Leave a Comment