Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनीधी [ Marathvada & Vidarbh Rain Update News ] : राज्यांमध्ये मराठवाडा व विदर्भाला पुढील 05 दिवस पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .हवामान खात्यांकडून दिलेल्या माहितीनुसार दिनांक 11 जुन पर्यंत मराठवाडा व विदर्भांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे . या दरम्यान विजेच्या कडाक्यासह जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

काल दिनांक 05 जुन पासुन मराठवाडा मधील धाराशिव ,बीड , लातुर भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे . तर पुढील 05 दिवसांमध्ये अवकाळी पाऊस विदर्भाकडे पुढे सरकणार आहे . भारतीय हवामान खात्यांने व पंजाबराव डख यांनी दर्शविलेल्या अंदाजानुसार 03 जुन पासुन अवकाळी पाऊस विदर्भाकडे सरकणार असल्याचा अंदाज सत्य होत आहे .

राज्यांमध्ये 08 जुन पासुन मान्सुन पाऊसाला सुरुवात होणार आहे , जसे जसे मान्सुन पुढे सरकेल तसे – तसे अवकाळी पाऊस संपणार आहे . दिनांक 08 जुन नंतर मान्सुन हा पश्चिम महाराष्ट्र व नंतर मराठवाडा व पुढे विदर्भाकडे प्रस्थान होणार आहे . यासाठी दिनांक 15 जुन वाट पाहावी लागेल . जसे – जसे मान्सुन पुढे सरकेल तसे – तसे अवकाळी पावसाची तिव्रता कमी होईल .

पुढील 05 दिवस पावसाचा अलर्ट जारी : मराठवाडा व विदर्भासाठी पुढील 05 दिवसांमध्ये विजेच्या कडाक्यासह मुसळधार पावसाची मोठी शक्यता असल्याने , हवामान खात्यांकडून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

अवकाळी पाऊस संपल्यानंतर लगेचच मान्सुन पर्जन्यास सुरुवात होणार असल्याने , जमीनीतील ओलावा पाहुन पेरणीला सुरुवात करण्याचा सल्ला हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिला आहे .  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *