Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maratha Reservation Update ] : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्याने , मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाले . परंतु सदर आरक्षणाला ओबीसी कल्याण संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला असून , याबाबत न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे .

राज्य सरकारने दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी अधिसूचना काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी मधून आरक्षण देण्याची प्रक्रिया दिनांक 16.02.2024 पर्यंत पुर्ण करण्यात आली . शिवाय या कालावधीमध्ये जेवढ्या सरकारी नोकर पदभरती निघाल्या त्यांमध्ये मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणाचा फायदा देण्यात आलेला आहे .

या शिवाय सदर अधिसूचनांमध्ये मराठ्यांकरीता सगेसोयरे यांना देखिल कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतुद यांमध्ये करण्यात आलेली आहे . याला देखिल न्यायालयात खेचण्यात आले आहेत . सदर याचिकेवर दिनांक 02 मे 2024 रोजी सुनावणी झाली , यांमध्ये याचिका कर्त्यांच्या वतीने गोपाळशंकर नारायणन यांनी भूमिका मांडली , यावेळी त्यांनी राज्य शासनांच्या अधिसूचनेला आक्षेप घेतला असून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देता येत नसल्याने , राज्य सरकारने मागील दाराने दिलेले आरक्षण चुकीचे असल्याचे सांगितले आहेत .

यावर राज्य शासनांकडून आपली भूमिका मांडण्याकरीता दिनांक 27 जुन पर्यं सदर याचिकेची सुनावणी ही तहकुब करण्यात आली आहे . यामध्ये राज्य सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावा लागणार आहे .  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *