Spread the love

मराठा समाजाला दिलासा देण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपायोजना राबवल्या जात आहेत. अशावेळी मराठा समाजामधील तरुण वर्गाला आरक्षण देण्याकरिता प्रशासनाने नवीन आयोग नियमावर असे महत्त्वाचे सूचना अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र पाटील यांनी केली आहे (Maratha Reservation news). उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळात योग्य बाजू मांडली नाही. त्यामुळे आरक्षण मागे गेले असा आरोप पाटील यांनी केला.

मुंबई : राज्यभरातील मराठा समाजाला शिंदे फडणवीस सरकारने जे काही आरक्षण दिले आहे ते न्यायालयात सुद्धा टिकू शकले नाही. त्यानंतर पुढे प्रशासनाने याबाबत याचिका दाखल केली होती. परंतु ही याचिका न्यायालयाने फेटाळली त्यानंतर पुढे प्रशासनाने क्युरेटिव्ह पिटीशन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला परंतु असे असताना सुद्धा प्रशासनाने गायकवाड आयोगाच्या शिफारशी विषयी विचार केला पाहिजे (Maratha Reservation in maharashtra). किंवा प्रशासन आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी नव्याने आयोग नेमावा अशी महत्त्वपूर्ण सूचना नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

फक्त एकाच वेळी करा गुंतवणूक करा आणि पेन्शनचे टेन्शन सोडा , LIC ची नविन जबरदस्त पेन्शन योजना !

मराठा समाजाने पुन्हा एकदा एकजूट होऊन मराठा आरक्षणाच्या मागणी करिता कंबर कसली असून, आता मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावे अशी मागणी सुद्धा केली आहे (Maratha Reservation). वास्तविकपणे आतापर्यंत चा आराखडा बघितला तर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणताही ठोस असा निर्णय झाला नसून अशा पद्धतीची मागणी करणे हे पूर्ण पणे उचित नाही असे पाटील म्हणाले.

हे पण वाचा : Petrol Pump : पेट्रोल पंपावर मिळत आहेत या सुविधा अगदी मोफत! आता नागरिकांची गैरसोय पूर्णपणे थांबेल! जाणून घ्या सविस्तर;

उद्धव ठाकरे मुळे गेले आरक्षण; मराठा आरक्षणाविषयी न्यायालयामध्ये मराठा समाजाची पूर्णपणे बाजू मांडण्याकरिता वकिलांना योग्यरीत्या सांगितले नसल्यामुळे योग्य पद्धतीने मराठा समाजाचे बाजूही न्यायालयात मांडली नाही. म्हणूनच त्यावेळी मराठा आरक्षण फेटाळले असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

खुशखबर : सरकारी कर्मचाऱ्यांना मागील 18 महिने कालावधीमधील डी.ए थकबाकी रक्कम मिळणार ?

मराठा तरुण वर्गाला महामंडळाच्या माध्यमातून दिलासा;

मराठा समाजामधील तरुण वर्गाला उद्योग धंद्यामध्ये मदत मिळवून देण्यासाठी सोबतच शैक्षणिक सुविधा प्रदान करण्यासाठी नक्कीच राज्य सरकार प्रयत्न करत आहे (Maratha reservation in Maharashtra latest News). यासोबतच महामंडळाच्या माध्यमातून सरकारने मराठा समाजामध्ये नवनवीन उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी विविध योजना राबवल्यास मिळेल उद्योजकांना प्रशासनाच्या माध्यमातून 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जात आहे आणि या कर्जाची मुदत ही आतापर्यंत पाच वर्षे होते ती पण वाढवून आता सात वर्षे केल्याची माहिती पाटील यांनी दिली.

यासोबतच मराठा प्रवर्गातील तरुण वर्गाला उच्च शिक्षण प्रदान करण्यासाठी कर्ज दिले जात आहे. या कर्जाच्या व्याजाचा परतावा हा पूर्णपणे महामंडळाच्या वतीने देत असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळाला तब्बल 300 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून त्यापैकी दीडशे कोटी रुपयांचा निधी हा वितरित केला आहे. त्यामुळेच याचा पूर्णपणे फायदा मराठा समाजामध्ये तरुण वर्गाला जास्तीत जास्त देता येईल असे त्यांनी सांगितले.

माथाडी कायद्यामध्ये सुद्धा नवीन बदल केले;

माथाडी कायद्यामध्ये सुद्धा बदल केला असून माथाडी कामगारांच्या हिताचे नवनवीन मुद्दे यामध्ये समाविष्ट केले आहेत. वास्तविकपणे माथाडी महामंडळाच्या माध्यमातून अनेक माथाडी कामगार हे पूर्णपणे बोगस पद्धतीने बसवले आहेत. अशी माहिती समोर आली आहे. तरी यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हात असून त्यांच्यामुळेच बोगस किंवा चुकीचे कामगार समाविष्ट झाले आहेत. या गोष्टीवर योग्य ती कारवाई करून जे खरे आणि प्रामाणिक माथाडी कामगार असतील त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याकरिता विविध निर्णय घेण्यात आले आहे. अशी माहिती पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *