Live Marathipepar , संगिता पवार , प्रतिनिधी [ Marathi – Kunabi Certificate Cabinate Nirnay ] : मराठवाड्यामधील निजाम कालीन तसेच इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारावरुन मराठा -कुणबी , कुणबी मराठा जात प्रमाणपत्र संदर्भात कार्यवाही निश्चित करणेकामी राज्य शासनांकडून गठित न्या. संदीप शिंदी समितीने शासनांस दिलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदी यांच्या अध्यक्षतेखाली स्विकत करण्यात आला .
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये , निवृत्त न्या.संदीप शिंदे समितीने सादर केल्यानुसार , सुमारे पावणे दोन कोटी इतक्या नोंदी तपासण्यात आले आहेत . यांमध्ये तब्बल 13,498 जुन्या कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत . सदर कुणबी नोंदी तपासण्याचे सध्या कामगाज सुरु असुन , अशा प्रकारच्या नोंदी असणाऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करण्यास दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे .
सदर दस्ताऐवज तपासताना , मोडी व उर्दु भाषांमध्ये कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत . सदर कागतपत्रांच्या भाषांतर करुन त्या कागतपत्रांचे डिजिटाईज करुन सार्वजनिक डोमेनवर आणून त्यांचा आधार घेवून कुणबी जातींचे प्रमाणपत्र देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे .
सदर सेवानिवृत्त संदीप शिंदे यांच्या केलेल्या शिफारशीनुसार मराठा – कुणबी तसेच कुणबी मराठा जातींचे प्रमाणपत्र देणेबाबत , कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहेत . याशिवाय मराठा समाजाचे सामाजिक तसेच मागासलेपणा ( शैक्षणिक ) तपासण्याकरीता तसेच मराठा समाजाचे सदर आरक्षण न्यायालयांमध्ये टिकुन राहतील यासाठी न्या . दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या . मारोती गायकवाड , न्या . संदीप शिंदे यांचे सल्लागार मंड यांची नियुक्ती करण्यास देखिल राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी देण्यात आलेली आहे .
तसेच राज्य मागास प्रवर्ग आयोगाला नव्याने डेटा गोळा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यामुळे मराठवाड्यातील सदर पुराव्यांनुसार मराठा -कुणबी , कुणबी – मराठा प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत .