मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत 10 टक्के आरक्षण ! सर्वेक्षण , निकष जाणून घ्या सविस्तर माहिती !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Marath Cast Reservation News ] : मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देणेबाबत , राज्य शासनांकडून ऐतिहासिक निर्णय देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे .

राज्यामधील सामाजिक त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या मागास असणाऱ्या मराठा समाजाला कायद्याच्या चौकटींमध्ये टिकणारे आरक्षण देण्याचा ऐतिहासिक व धाडसी निर्णय घेण्यात आलेला आहे . या संदर्भातील विधेयक हे राज्य शासनांच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजूर झाला आहे . या आरक्षणाचे वैशिष्ट्ये म्हणजे इतर मागास वर्ग ( ओबीसी अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता हे आरक्षण देण्यात आलेला आहे .

कायद्याच्या चौकटीतील आरक्षण : हे 10 टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण असणारे विधी तज्ञांने सांगण्यात आलेले आहेत . उच्च न्यायालयांमध्ये मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी विधी तज्ञांची फौज तयार करण्यात आली असल्याची माहिती विशद करण्यात आलेली असून , यापुर्वी मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण का टिकू शकले नाहीत , यावर समिक्षकपणे अभ्यास करुन सध्याचे आरक्षण कसे टिकेल याकरीता विधी तज्ञ पुढील काम करणार आहेत .

मराठा आरक्षणांसाठी राज्य सरकारचे युद्धपातळीवरील सर्वेक्षण : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने 23 जानेवारी पासून ते दिनांक 02 फेब्रुवारी 2024 पर्यंत अवघ्या नऊ दिवसांमध्ये सर्वेक्षणाचे काम पुर्ण करण्यात आलेले आहेत . सदर सर्वेक्षणांच्या आधारावरच सदरचे आरक्षण देण्यात आलेले आहेत . या  सर्वेक्षणांमध्ये मराठा समाजाचे मागासलेपणा , आर्थिक स्थिती बाबत सर्वेक्षण करण्यात आले होते .

सध्या मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण दिले गेले आहेत , पण न्यायालयांमध्ये टिकेल याकरीता राज्य शासनांकडून तयार करण्यात आलेली विधी तज्ञांची टिम यापुढे काम करणार आहे. तर या सर्वेक्षणांमध्ये काम केलेल्या सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत .

Leave a Comment