दि.16 मे रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचारी पगार वाढीसह घेण्यात आले इतर मोठे महत्वपूर्ण निर्णय !

Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : दि 16 मे 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीसह अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत .राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि.16.05.2023 रोजीची मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली .

या बैठकीत नागरिक तसेच कर्मचारी हिताचे मोठे महत्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात आलेले आहेत .यामध्ये राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील कार्यरत कंत्राटी निदेशक यांच्या मानधनात मोठी वाढ करणेबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे .

पगारात 10 हजाराची वाढ : वरील नमूद निदेशकांना यापूर्वी 15,000/- रुपये प्रति महा मानधन दिले जात होते .आता यामध्ये तब्बल 10 हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याने , आता सदर निदेशकांना प्रति महा 25,000/- रुपये प्रति महा देण्यात येणार आहेत .या निर्णयाचा फायदा राज्यातील तब्बल 297 निदेशकांना फायदा होणार आहे .

हे पण वाचा : NPS धारक कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन , सेवानिवृत्ती उपदान लागू करणेबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय !

सदर निदेशकांची प्रदीर्घ सेवा , सध्याच्या महागाईचा विचार करून मानधनात वाढ करण्यात आलेली आहे .दरवर्षी सदर कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेवून सेवा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे .

शासकीय कर्मचारी विषयक , नोकर पदभरती योजना व बातम्यांच्या अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment