Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mantri parishad nirnay ] : काल दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्री परिषदेत 02 महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत , सदर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
01.शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाची स्थापना : जिल्हा कोल्हापुर येथिल कागल तालुक्यात नव्याने होमिओपॅथी महाविद्यालयाची स्थापना मौजे पिंपळगाव खुर्द येथे करण्यास मंत्री परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिली आहे .
यांमध्ये सांगाव गावात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नविन होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित 50 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास दिनांक 04.10.2024 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आलेली होती . सदर निर्णयानुसारच सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथे गायरान जमिन 5.75 एकर सदर महाविद्यालयासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .
02.राज्य निवडणुक आयुक्त पदाच्या नावाची शिफारस करण्याचा अधिकार मा.मुख्यमंत्र्यांकडे : राज्य निवडणूक आयुक्त पदाच्या नावाची शिफारस करण्याचा अधिकार हा राज्याचे मा.मुख्यमंत्री यांना देण्यास सदर राज्य मत्री परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे .