Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ mansun rain Update upto 10 October] : सध्या मान्सून परतीच्या प्रवासात असून परतीचा पाऊस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पडत आहे . सदर परतीचा पाऊस राज्यामध्ये पुढील तीन आठवडे पर्यंत पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे .

परतीचा पाऊस दिनांक 23 सप्टेंबर पासून अधिक सक्रिय होणार असल्याचे वृत्त हवामान खात्याकडून देण्यात आले असून , सदरचा पाऊस राज्यामध्ये दि. 10 ऑक्टोबर पर्यंत सक्रिय राहील , असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे . सध्या राज्यातील मराठवाडा , विदर्भामध्ये परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे . अनेक ठिकाणी पिकांची नुकसान होताना दिसून येत आहे .

मागील आठवड्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला होता , परंतु 21 सप्टेंबर पासून मान्सून सक्रिय होताना दिसून येत आहे . मागील आठवड्यामध्ये मराठवाडा , विदर्भामध्ये तापमान अधिक वाढले होते . पावसामुळे सदर तापमानामध्ये घट झाली आहे . यंदा मराठवाडा , विदर्भामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून , पिकांची चांगली वाढ झाली आहे . परंतु काढणीच्या वेळी पाऊस अधिक जोरदार असल्याने , पिकांचे नुकसान होताना दिसून येत आहेत .

राज्यातील बीड , लातूर , कोल्हापूर,  सातारा , पुणे , अहमदनगर या जिल्ह्यामध्ये दिनांक 29 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . भारतीय हवामान खात्याकडून दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 23 सप्टेंबर पासून मान्सून परतीच्या प्रवासाला जाईल . दि. 23 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

त्यानंतर मात्र पाऊस कमी होईल , सदर मान्सून परतीच्या पावसामुळे जमिनीमध्ये आलेल्या ओलावावर रब्बी पिकाची पेरणी जमिनीतील ओल पाहून करण्यात यावेत , असे तज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *