Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ mansun rain Update news for next 02 days ] : सध्या राज्यामध्ये मान्सून परतीच्या मार्गावर असून , पुढील 02 दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार , राज्यामध्ये दिनांक 07 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार , दिनांक 07 ऑक्टोबर पर्यंत राज्यात परभणी , छत्रपती संभाजीनगर , नाशिक , जळगाव , जालना , हिंगोली, वाशिम , नांदेड , लातूर , धाराशिव , सातारा , सांगली , सोलापूर , अहमदनगर , कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
या कालावधीमध्ये राज्यात विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . त्याचबरोबर राज्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचे भाग बदलणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . तर सदर कालावधीमध्ये विदर्भातील वर्धा , नागपूर , बुलढाणा ,गोंदिया , भंडारा , अमरावती , अकोला या जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे .
त्याचबरोबर भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मध्य महाराष्ट्र , मराठवाडा , विदर्भातील काही जिल्हे व कोकण या भागांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्याने पुढील 02 दिवस , शेतकऱ्यांनी शेती पिकांची काळजी घेण्याचे सुचित करण्यात आली आहेत .
या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी शेतमाल योग्य ठिकाणी साठवणूक करावा तसेच पिकांची काढणीचे कामकाज लवकर करून घ्यावे , जेणेकरून पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल .