Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Mansun Purv Rain Update News ] : राज्यांमध्ये मान्सुन पुर्व मोसमी पाउसाला सुरुवात होणार आहे , यासाठी हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना तातडीची सुचना दिली आहे , पुर्वमोसमी पावसाच्या अनुषंगाने शेतीमधील काही मशागती पुर्ण करुन घेण्यासाठी ही तातडीची माहिती हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्याकडून देण्यात आलेली आहे .

मागील महिन्यांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे , सध्या अवकाळी पावस राज्यात सक्रिय आहे , राज्यात सध्या अवकाळी पाऊस हा गारपीटांसह पडत आहे , यामुळे शेतीमधील उभ्या पिकांचे नुकसान होत आहेत . हवामन खात्याच्या व हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार , राज्यांमध्ये दिनांक 07 मे ते दिनांक 11 मे दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी कायम आहे .

वरील नमुद तारखेच्या दरम्यान विदर्भ व मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होत आहेत . आता मे महिन्यांच्या 11 तारेखनंतर अवकाळी पावसाचा ओघ बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे , यानंतर राज्यांमध्ये पुर्वमोसमी पावसाला सुरुवात होणार आहे .

काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे , यामुळे शेतकऱ्यांनी 11 तारखेनंतर खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करुन घेण्याच्या सुचना पंजाबराव डख यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत .

अवकाळी पावसाच्या समाप्तीनंतर राज्यांमध्ये सुरु होणाऱ्या पुर्वमोसमी पावसांपासुन जमीनीतील पाण्याची पातळीमध्ये वाढ होण्यास सुरुवात होणार आहे . यामुळे त्यानंतर शेतीची मशागत करणे अवघड जाईल , यांमुळे पेरणीपुर्व शेतीची मशागत करुन घेण्याच्या सुचना शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *