Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ rain update upto 11 October ] : सध्या पाऊस हा परतीच्या प्रवासात आले , तर दिनांक 11 ऑक्टोंबर पर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
आपल्या महाराष्ट्र राज्यातुन मान्सुन परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेला आहे . राज्यातुन दिनांक 05.10.2024 पासुन मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे , तर मान्सून नंदुरबार या जिल्ह्यातुन माघारी निघत आहे . राज्यातुन दिनांक 15 ऑक्टोंबर दरम्यान मान्सून राज्यातुन पुर्णपणे निघून जाईल असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे .
मान्सून जाता जाता राज्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे . आता दिनांक 11 ऑक्टोंबर पर्यंत मान्सून मोठ्या प्रमाणत पडणार असल्याचा अंदाज आहे . हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील 10 राज्यांना दि.11 ऑक्टोंबर पर्यंत अति मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
आज दि.08 आक्टोंबर रोजीचा अंदाज : आज दिनांक 08 ऑक्टोंबर 2024 रोजी देशात लक्षद्वीप , त्रिपुरा , मिझोराम , नागालँड , अरुणाचल प्रदेश , कर्नाटक , तामिळनाडू , आसाम , मेघालय , केरळ , मणिपुर या राज्यांमध्ये अतिवृष्टी होण्याचा शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
09 ऑक्टोबर रोजीचा अंदाज : दिनांक 09 ऑक्टोंबर 2024 रोजी देशात केरळ , त्रिपुरा , आसाम , मेघालय , लक्षद्वीप , कर्नाटक , अरुणाचल प्रदेश , नागालँड , तामिळनाडु , मणिपुर , मिझेराम या रोज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
10 ऑक्टोंबर रोजीचा अंदाज : दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी देशात मेघालय , आसाम , तामिळनाडु , अरुणाचल प्रदेश , लक्षद्वीप , केरळ या राज्यांमध्ये मध्ये स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे .
दि.11 आक्टोंबर रोजीचा अंदाज : दिनांक 11 ऑक्टोंबर 2024 रोजी देशात पावसाचा जोर बराच कमी होणार आहे , परंतु या दिवशी देशात मेघालय , आसाम , अरुणाचल प्रदेश , केरळ , लक्षद्वीप या राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .