Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mansoon rain update news new ] : मान्सुनची वाटचाल दिनांक 8 जुन नंतर राज्यांमध्ये चांगली प्रकारे प्रगतीपथावर असतानाच राज्यांमध्ये अचानक मान्सुनने चक्क पाठ फिरवली आहे , यामुळे राज्यातील शेतकरी पेरणी करुन चिंतेत आहेत .यावर हवामान खात्यानेही देखिल धक्कादायक अंदाज वर्तविण्यात आलेला आहे .
हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार , जुन महिन्यांमध्ये देशांमध्ये सरासरीपेक्षा 92 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे . तर राज्यातील उत्तर कोकण , उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भागांमध्ये जुन अखेर चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . हवामान खात्यांने यापुर्वी वर्तविलेल्या अंदाजापेक्षा देशांमध्ये माहे जुन महिन्यांत 92 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे .
पेरणीनंतर बळीराजा चिंतेत : राज्यांमध्ये विदर्भ / मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला अवकाळी पाऊस झालेला आहे , यामुळे तेथील शेतकऱ्यांनी पेरणी करुन टाकली आहे , तर या भागांमध्ये किरकोळ प्रमाणात पाऊस सुरुच आहे .
हवामान खात्यांने दिलेल्या अंदाजानुसार माहे जुलै महिन्यांच्या शेवटच्या आठवडा पर्यंत मान्सुन पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे . जुन महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापासुन विदर्भ / मराठवाडा मध्ये मान्सुन पाठ फिरवेल , तर कोकण / पश्चिम महाराष्ट्रांमध्ये मान्सुन अधिक सक्रिय होण्याचा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे , जुनच्या शेवटच्या आठवड्यांपासुन ते जुलै महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यांपर्यंत जमिनीमध्ये पोषक ओल असेल तर पिकांची वाढ होईल , अथवा शेतकऱ्यांना आपल्या सिंचन स्त्रोताचा वापर करावा लागणार आहे .
यामुळे शेतकरी पेरणी करुन चिंतेत सापडले आहेत , तर हवामान खात्याचे अंदाज देखिल चुकिचे ठरत असल्याने , शेतकरी अधिकच संभ्रमात आहेत . यंदा पावसाचे सरारीपेक्षा सर्वाधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेला होता , तर मान्सुन सुरु होवून 20 दिवस झाले तरी मान्सुनने दमदार सुरुवात केलेली नाही .