Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : केंद्र सरकारने पुरुष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे , ज्यामुळे आता पुरुष कर्मचाऱ्यांना देखील आई-वडिलांप्रमाणे सासू-सासरे यांना देखील आरोग्य योजनेचा लाभ देऊ शकणार आहेत . या संदर्भात केंद्र शासनाकडून दि.27.07.2023 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे .

केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधेचा लाभ घेण्यासाठी आई – वडील अथवा सासु – सासरे अशी निवड करण्याची मुफा महिला कर्मचाऱ्यांना देण्यात येत असते . अशाच प्रकारे आता पुरुष कर्मचाऱ्यांना देखील आरोग्य योजनेचा लाभ आई – वडील अथवा सासु-सासर्‍यांच्या लोकांना लाभार्थी बनू शकणार आहेत …

CGHS योजना नेमकी काय आहे ? : आयुष्यमान भारत योजना प्रमाणे व त्यांच्या नातेवाईकांना CGHS योजना अंतर्गत विशेष उपचार मोफत आरोग्य तपासणी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असते , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा खर्च देखील कमी होत असतो . महिला कर्मचाऱ्यांना यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आई – वडील किंवा सासू-सासरे यांची निवड करण्याची मुफा होती , आता याची व्याप्ती वाढवून पुरुष कर्मचाऱ्यांना देखील आई-वडिलाप्रमाणेच सासू सासर्‍यांची निवड करू शकणार आहेत ..

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांची मुख्यालयी राहण्याची अट शिथिल! मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन , आता कर्मचाऱ्यांना या सुविधा पुरवल्या जातील !

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार : या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांबरोबरच पुरुष कर्मचारी यांना हा लाभ मिळणार आहे . त्याचबरोबर विद्यमान आणि माजी खासदार तसेच नायब राज्यपाल , राज्यपाल ,स्वातंत्र्यसैनिक ,माजी राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे वर्तमान आणि माजी न्यायाधीश, दिल्लीमधील कर्मचारी, पोलीस, रेल्वे बोर्ड कर्मचारी, पोस्ट ऑफिसचे कर्मचारी या सर्वांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे.

आपण जर शासकीय -निमशासकीय कर्मचारी , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *