पितृत्व रजा संदर्भातील सविस्तर , महत्त्वपूर्ण शासन निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ male  balasankopan Raja shasan nirnay ] : महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजा दिल्या जातात . त्याचप्रमाणे  पुरुषांना देखील काही विशिष्ट प्रसंगी बालसंगोपन रजा दिले जाते . या संदर्भात वित्त विभागाकडून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR  ) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरचा शासन निर्णय (GR ) पुढीलप्रमाणे पाहूयात ..

ज्या प्रसंगी अपत्य हा विकलांग असून पत्नी नसलेल्या शासकीय पुरुषांना अशा प्रकारची बालसंगोपन रजा संपूर्ण सेवेमध्ये 730 दिवसांच्या कमाल मर्यादित मंजूर करता येते . विकलांग व्यक्तीमध्ये अंधत्व , क्षीणदृष्टी , बरा झालेला कुष्ठरोग , श्रवण शक्तीतील दोष , चलन वलन विषयक विकलांगता , मतिमंदता मानसिक आजारपण या बाबींचा समावेश असेल .

सदरची विकलांगता किमान 40% किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक असेल , त्या संदर्भात वैद्यकीय प्राधिकरणाने प्रमाणित केले असणे आवश्यक असणार आहेत . अथवा आत्ममग्न , सेलेब्रल , पाल्सी , मतिमंद , बहु विकलांग व गंभीर स्वरूपाच्या विकलंगता असणारे अपत्य अशा प्रसंगी पुरुषांना बालसंगोपन रजा घेता येते .

सदरची रजा ही अपत्य 22 वर्षाचे होईपर्यंत ,  अशा प्रकरणी घेता येते , सदरची रजा ही पहिल्या दोन हयात अपत्या करिताच घेता येते . याशिवाय विशेष बालसंगोपन रजेच्या कालावधीसाठी रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी जेवढे वेतन मिळत असेल , तेवढेच वेतन रजा वेतन देण्यात येते .

विकलांग अपत्य शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून आहे , अशा प्रकारचे प्रमाणपत्र शासकीय कर्मचाऱ्यांनी सादर करणे आवश्यक असते . सदरची रजा ही त्याच्या एकूण सेवेच्या कालावधीमध्ये एकूण 730 दिवस कमाल मर्यादेत रजा घेता येते .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment