Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Stri Shakti Yojana ] : स्त्री शक्ती योजना अंतर्गत सरकारकडून महिला उद्योजकांना अल्प व्याजदारांमध्ये तब्बल 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहेत . या योजनाची सविस्तर माहिती , व्याजदर , अर्ज प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी विविध योजना सरकारकडुन राबविण्यात येत असतात , स्त्री शक्ती योजना अंतर्गत महीलांना लघु , मध्यम व मोठ्या उद्योगाच्या विस्तार / विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना राबविण्यात येत असते . ज्यांमध्ये महिला उद्योजकांना दीर्घ मुदतीकरीता अल्प व्याजदारांमध्ये कर्ज पुरवठा करणे हा मुख्य उद्देश आहे .

पात्रता : या योजना अंतर्गत राज्य सरकारकडून राबविण्यात आलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रम अंतर्गत नोंदणीकृत महिलांना या योजनांच्या माध्यमातुन रुपये 25,00,000/- इतक्या रक्कमेचे कर्ज पुरवठा करण्यात येते . तसेच या योजना अंतर्गत महिलांचा उद्योगाचा स्टार्टअप सुरु होणे आवश्यक असते . उद्योगाच्या स्वरुपानुसार कर्ज पुरवठा करण्यात येते .

व्याजदर : या योजना अंतर्गत कर्जाची मर्यादा ही 25,00,000/- रुपये इतकी आहे , सदर योजना अंतर्गत 2,00,000/- रुपये पेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्यांकरीता व्याजदरांमध्ये 0.5 टक्के इतकी सवलत देण्यात येते . तर लघु , सुक्ष्म व मध्यम उद्योग करीता रुपये 50,000 ते 25,00,000/- रुपये पर्यंत कर्ज देण्यात येते . स्त्री शक्ती पॅकेज या योजना अंतर्गत या कर्जावरील व्याजदर हे 5 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असते . शिवाय या योजनांतर्गत रुपये 5 लाख पर्यंत कर्ज घेण्याकरीता कोणतीही सुरक्षा हमीची आवश्यकता नसते .

आवेदन कसा करावा ? ही योजना स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत राबविण्यात येत असल्याने , सदर बँकेच्या कोणत्याही शाखेत भेट देवून या योजना अंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी आवेदन सादर करु शकता .

लागणारे कागदपत्रे : या योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता आधार कार्ड , पॅन कार्ड , तसेच बँक खाते तपशिल , मोबाईल नंबर , ईमेल आयडी तसेच व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रे आवश्यक असतील .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *