महिला किसान योजना अंतर्गत राज्य शासनांकडून मिळते 50,000/- रुपये अर्थसहाय्य ; जाणून घ्या सविस्तर माहिती !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mahila kisan yojna info ] : महिला किसान योजना अंतर्गत महिलांना तब्बतल 50,000/- रुपये पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते , याकरीता आवश्यक अटी / शर्ती व आवश्यक कागदपत्रे या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..  

या योजना अंतर्गत राज्यातील चर्मकार समाजातील ज्या महिलांच्या नावे अथवा पतिपत्नी या दोघांच्या नावावर अथवा पतीच्या नावांवर 7/12 उतारा आहे व त्या महिला लाभार्थीचा पती प्रतिज्ञा पत्राद्वारे स्वत : च्या पत्नीस शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी सदर शेतजमिनीच्या नावे कर्ज मंजूर करुन घेण्यास तयार असेल अशा महिला लाभार्थीस रुपये 50,000/- पर्यंत अर्थसहाय्यक दिले जाते .

यांमध्ये रुपये 10,000/- रुपये अनुदान व उर्वरित रक्कम रुपये 40,000/- कर्ज स्वरुपात वार्षिक 5 टक्के व्याज दराने मंजूर करण्यात येते . सदर कर्ज हे फक्त शेतीसाठी अथवा शेतीपुरक व्यवसायासाठीच देण्यात येते .यामुळे सदर योजनांच्या माध्यमातुन चर्मकार समाजातील महिलांना शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य होईल .

सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज , उत्पन्नाचा दाखला , जातीचा दाखला , प्रशिक्षण प्रमाणपत्र , रहिवाशी प्रमाणपत्र , कच्चा मालाची दरपत्रके , व्यवसायाच्या जागेसंबंधीची कागदपत्रे , व्यवसायाशी निगडीत परवानगी , 02 जामीनदारांची संमतीपत्रे , अर्जदाराची 02 पासपोर्ट फोटो या कागदपत्रांची आवश्यक असेल .

अर्ज कसा कराल ? : या  योजनांच्या माध्यमातुन अर्ज सादर करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा .

Leave a Comment