महायुती सरकारच्या जाहीरनाम्यात पेन्शन वृद्धी , शेतकऱ्यांच्या सन्मान राशी वाढ ; तसेच लाडकी बहीणींना महिन्याला 2100/- रुपये !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mahayuti sarakar new jahirnama for pension increase , pm sanman rashi increase & Ladaki bahin scheme ] : महायुती सरकारच्या जाहीरनाम्यात आता बदल करण्यात आलेला आहे , ज्यांमध्ये आता पेन्शन वृद्धी तसेच शेतकऱ्यांच्या सन्मान राशीत वाढ करण्यात आलेली आहे . त्याचबरोबर लाडकी बहीणींना दर महिन्याला 2100/- रुपये देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .

पेन्शन वृद्धी : वृद्धांना सध्या मिळत असणाऱ्या पेन्शन मध्ये वाढ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे . म्हणजेच सध्या वृद्धांना 1500/- रुपये पेन्शन मिळते ,यांमध्ये आता 600/- रुपयांची वाढ करण्यात येणार आहे , म्हणजेच एकुण 2100/- रुपये पेन्शन दिले जाणार असल्याचे जाहीरनाम्यान नमुद करण्यात आलेली आहे .

शेतकऱ्यांच्या सन्मान राशीत वाढ : शेतकऱ्यांच्या सन्मान राशीत 3000/- रुपयांची वाढ करण्यात येणार आहे . म्हणजेच शेतकऱ्यांना सध्या पीएम किसान सन्मान योजना व राज्याच्या नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत एकुण 12000/- रुपये प्रतिवर्षी दिले जाते . तर आता नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत वर्षाला 6,000/- रुपये ऐवजी 9,000/- रुपये दिले जाणार आहेत , म्हणजेच वर्षाला दोन्ही योजना अंतर्गत 15,000/- रुपये दिले जाणार असल्याचे जाहीरनाम्यात नमुद करण्यात आलेले आहेत .

लाडकी बहीनींना वाढ रक्कम : लाडकी बहीण योजना अंतर्गत सध्या पात्र महिलांना 1500/- रुपये दिले जाते , तर सदर योजना अंतर्गत आता 600/- रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . म्हणजेच महिन्याला 2100/- रुपये दिले जाणार असल्याचे जाहीरनाम्यात नमुद करण्यात आलेले आहेत .

Leave a Comment