Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ mahavikas aghadi new declaration ] : सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुका जिंकण्याकरिता विविध पक्षाकडून जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात येत आहेत , यातच महाविकास आघाडी पक्षाकडून काही महत्त्वपूर्ण घोषणांची यादी सदर जाहीरनामा मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे .
महाविकास आघाडी पक्षाकडून एकत्रित जाहीरनाम्याला “महाराष्ट्रनामा” असे नाव देण्यात आले असून , यामध्ये महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीत दोन दिवसांची ऐच्छिक सुट्टीची तरतूद करण्यात आलेली आहे . त्याचबरोबर प्रत्येक मुलीच्या खात्यामध्ये एक लाख रुपये दर वर्षाला देण्याची घोषणा करण्यात आली आहे .
याशिवाय तीन लाख रुपये पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी तर , नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत सूट देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे . याशिवाय जातीय जनगणना केली जाईल , तसेच 300 युनिट वीज वापर करणाऱ्यांना 100 युनिट वीज माफ केली जाईल , अशी घोषणा करण्यात आली आहे .
याशिवाय लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने महालक्ष्मी योजना राबवली जाईल , सदर योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 3000/- हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे . तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल . तसेच राज्य शासन सेवेत 2.5 लाख सरकारी रिक्त पदावर पदभरती करण्यात येईल . तसेच कंत्राटी भरती पद्धती रद्द करण्यात येईल .
गरजूंना बिनव्याजी पाच लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार , युवकांच्या कल्याणाकरिता युवा आयोगाची स्थापना करण्यात येईल . तर महिलांना बस सेवा पूर्णपणे मोफत करण्यात येईल , तसेच घरगुती सिलेंडर पाचशे रुपयांमध्ये उपलब्ध करून देणार . तसेच आरक्षणाची 50% ची मर्यादा हटवण्यात येईल , अशा महत्त्वपूर्ण घोषणा महाविकास आघाडी कडून करण्यात आले आहेत .